शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण महिलांच्या मदतीला धावणार ‘दामिनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:19 IST

विवाहितेचा विविध कारणांवरून होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी ग्रामीण भागात ‘दामिनी’ पथक धावणार आहे. या पथकाच्या स्वतंत्र वाहनांना मंगळवारी (दि.२६) हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

नाशिक : विवाहितेचा विविध कारणांवरून होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी ग्रामीण भागात ‘दामिनी’ पथक धावणार आहे. या पथकाच्या स्वतंत्र वाहनांना मंगळवारी (दि.२६) हिरवा झेंडा दाखविण्यात आला.  निमित्त होते, जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित ‘सखी’ मेळाव्याचे. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर, योगा प्रशिक्षक प्रज्ञा पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार, बचत गटाच्या आश्विनी बोरस्ते, अ‍ॅड. दीपाली खेडकर, पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपअधीक्षक अतुल झेंडे, अपर उपअधीक्षक विशाल गायकवाड, रोहिणी दराडे, दीपिका झेंडे, प्रियंका दराडे आदी उपस्थित होते.  यावेळी शहरासह ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा, येवला, सटाणा, कळवण, सिन्नर, मनमाड, चांदवड आदी तालुक्यांमधील गावागावांतून विविध शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी दराडे म्हणाले, आधुनिक युगात पुरुषांच्या तुलनेत महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही; मात्र महिला, युवतींच्या बाबतीत घडणाºया गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनाही वाढल्या आहेत. यासाठी महिलांनी सक्षम होऊन त्याविरोधात जागरूकता दाखवून सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे व पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. यासाठी पूरक ठरणारा ‘आता बस्स...!’ हे अभियान ग्रामीण पोलीस दलाकडून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.असे आहे पथक; करा १०९१ वर संपर्क‘दामिनी’ पथकाकडून तत्काळ संकटसमयी महिलांना मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी एक मदतवाहिनी क्रमांक देण्यात आला आहे. ‘१०९१’ या क्रमांकावर संपर्क साधल्यास तत्काळ महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी मदतीसाठी संबंधितांकडे पोहचेल, असे यावेळी सांगण्यात आले. पथकामध्ये एक महिला पोलीस अधिकारी व चार कर्मचाºयांची एका वाहनावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण सहा वाहने जिल्ह्याच्या रस्त्यावर धावणार आहेत. चार अधिकारी व २४ महिला कर्मचाºयांचे ‘दामिनी’ पथक आहे.