शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कांदा आयातीनेच केले शेतकºयांचे नुकसान : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:49 IST

नाशिक : भाववाढीमुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला असताना, दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने इजिप्तहून कांदा आयात केल्यानेच शेतकºयांचे नुकसान झाल्याचा आरोप कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. कांदा आयातीला विरोध करणार असल्याचे सांगत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.

नाशिक : भाववाढीमुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला असताना, दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने इजिप्तहून कांदा आयात केल्यानेच शेतकºयांचे नुकसान झाल्याचा आरोप कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. कांदा आयातीला विरोध करणार असल्याचे सांगत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.नाशवंत शेतमालाच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समिती सदस्यांची सोमवारी तिसरी बैठक (दि. ११) नाशिक येथे झाली. या बैठकीनंतर पाशा पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारने शेतमालासह फळपिकांना चांगले दर मिळवून देण्यासाठी कृषी पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृषी मूल्य आयोग गठित केला असून, या आयोगाची तिसरी बैठक सोमवारी नाशिकला झाली. बैठकीस पाशा पटेल यांच्यासह सह्णाद्री अ‍ॅग्रोचे विलास शिंदे, महाग्रेप्सचे सोपान कांचन, शेतकरी अंकुश पडवळ यांच्यासह राज्यभरातील ६० सदस्य उपस्थित होते. यावेळी पाशा पटेल म्हणाले, कांदा जीवनावश्यक पीक नाही. कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय देण्यासाठी शीतगृहांसह निर्यातीचे धोरण ठरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कांदा उत्पादक शेतकºयांना भाववाढीमुळे चांगले पैसे मिळू लागले होते. परंतु, दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी इजिप्तहून कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा होता. त्यामुळे दरात घसरण झाली हा निर्णय शेतकºयांवर अन्याय करणारा ठरला आहे. कांदा आयातीच्या निर्णयाला यापुढे विरोध करणार असल्याचे सांगत पाशा पटेल यांनी केंद्र सरकारचा निर्णय चुकल्याचे म्हटले आहे. पाशा पटेल यांनी पुढे सांगितले की, भारतीय कांद्याला मागणी असणाºया देशांमध्ये कांदा निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, पुढील पाच वर्षांचे निर्यातीचे धोरण आखले जात आहे. गेल्या साठ वर्षांत शेतीमालाची व्यवस्था सडली असून, ती नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कांद्याला चांगला हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी पाशा पटेल यांनी सांगितले.