शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कमलधरा धरण फुटल्याने लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:45 IST

काटवण परिसरातील वळवाडे शिवारात असलेले कळमदरा धरण फुटून १४७ शेतकऱ्यांचे ८७.३१ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विद्युतखांब शेतात कोलमडून पडली आहेत. वीस ते पंचवीस विहिरींचे पुराच्या पाण्यामुळे गाळ भरून नुकसान झाले.

ठळक मुद्देवळवाडे शिवार । महसूल विभागाच्या वतीने पंचनामा

वडनेर : तालुक्यातील काटवण परिसरातील वळवाडे शिवारात असलेले कळमदरा धरण फुटून १४७ शेतकऱ्यांचे ८७.३१ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विद्युतखांब शेतात कोलमडून पडली आहेत. वीस ते पंचवीस विहिरींचे पुराच्या पाण्यामुळे गाळ भरून नुकसान झाले. नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला असून, कृषिमंत्री दादा भुसे यांनी नुकसानीची पाहणी केली.शुक्रवारी दुपारी अचानक पुराचा लोंढा आल्याने शेतकऱ्यांना संधी न मिळाल्याने गुरे वाहून गेली आहेत. पिंटू घुले या शेतकºयाच्या सात शेळ्या, दोन गायी व एक वासरू वाहून गेले आहेत. वाघखोरे वस्तीवर अण्णा अहिरे यांच्या चाळीत पुराचे पाणी शिरल्याने चाळीतील कांद्याचे नुकसान झाले आहे. अंबासन, वळवाडे, वाघखोरे परिसरातील डोंगररांगांमधून वाहणाºया नाल्यांचे पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या पुरातन धरणाला संततधार पावसामुळे भगदाड पडले. पाण्याच्या लोंढ्यामुळे मका, बाजरी, कांदा पिके अक्षरश: आडवी झाली.घटनास्थळी स्थानिक स्तर लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता संजय पाटील, ग्रामसेवक हेमंत सावंत, तलाठी मनोज अहिरराव यांनी भेट देऊन पाहणी केली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी नुकसानीची पाहणी केली.यावेळी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, जिल्हा कृषी अधिकारी देवरे, लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी शेलार कृष्णाभाऊ ठाकरे, घनश्यामअहिरे, भूषण देवरे, प्रवीणठाकरे, बळवंत ठाकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवRainपाऊस