शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा परिसरात वादळी पावसाने नुकसान, अंगावर भिंत पडून चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:26 IST

पाटोदा : परिसरात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने घर अंगावर कोसळल्याने शिवाजी बोरनारे यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहे. मंगेश केंगे यांचे सुमारे दोन एकर शेतीचे पॉलिहाउस उडून गेले तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.

पाटोदा : परिसरात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने घर अंगावर कोसळल्याने शिवाजी बोरनारे यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहे. मंगेश केंगे यांचे सुमारे दोन एकर शेतीचे पॉलिहाउस उडून गेले तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर यांनी परिसरात भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त बोरनारे कुटुंबीयांना उपचारासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. पाटोदा सजाचे तलाठी सुनील तळवे यांनी नुकसानीचे पंचनामे करून तहसीलदारांना अहवाल सादर केला.--------------महिलेस गंभीर दुखापतपाटोदा येथील शिवाजी पुंजा बोरनारे यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून शेतात जाऊन पडले, तर पत्रे उडाल्यानंतर संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. पत्रे उडाल्याने घरातील काही माणसे घरातील पलंगाखाली लपले मात्र संपूर्ण भिंत पलंगावर पडल्याने लपलेली माणसे दबली गेली. त्यात शिवाजी बोरनारे, सविता बोरनारे, गोरख बोरनारे व लहान बालिका निर्जला बोरनारे जखमी झाले असून, या सर्वांना येवला येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविता बोरनारे यांच्या हात पाय व तोंडाला मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना मुका मारदेखील लागला.-----------------१ पाटोदा परिसरात सुमारे दोन तास झालेल्या या वादळी पावसाने विजेच्या तारा तुटून पडल्या. अनेक झाडे व विद्युत खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. कैºया पडल्याने मोठे नुकसान झाले.२ वाºयाचा वेग प्रचंड असल्याने मंगेश श्रीकांत केंगे यांच्या गट २३५ मध्ये असलेले पॉलिहाउस वादळाने जमीनदोस्त झाले असून, त्यांचे सुमारे पंधरा ते अठरा लाखांचे नुकसान झाले आहे. ताराबाई अशोक बैरागी यांच्याही पॉलिहाउसचे सुमारे बारा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे.३ परिसरातील राजेंद्र विश्वनाथ शिंदे, बबन माणिक जाधव या शेतकºयांच्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या असून साहेबराव आहेर, जानकीदास बैरागी यांच्या डाळिंबबागांचे नुकसान झाले आहे. सिंधूबाई बैरागी, अशुदुला चौधरी, गीताबाई आहेर यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. ज्ञानेश्वर जाधव, विठाबाई शेटे यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने संपूर्ण कांदा भिजून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक