शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धरणसाठा ३० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 01:31 IST

जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा ३० टक्के इतकाच असल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. यंदा एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शुभवार्ता असली तरी बदलत्या ऋतूचक्रामुळे पावसाची प्रतीक्षा देखील करावी लागत असल्याचा अनुभव   असल्याने   जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ५ टक्के साठा कमी असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देकाटकसर हवी : गंगापूर समूहातील पातळीही घटली

नाशिक : जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा ३० टक्के इतकाच असल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. यंदा एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शुभवार्ता असली तरी बदलत्या ऋतूचक्रामुळे पावसाची प्रतीक्षा देखील करावी लागत असल्याचा अनुभव   असल्याने   जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ५ टक्के साठा कमी असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षापूवी झालेला  दमदार पाऊस तर गतवर्षात अखेरच्या चरणापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणे तृप्त झाली होती. त्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतू एप्रिल  तसेच मे महिन्याच्या मध्यापर्यंत धरणसाठा कमी होऊ लागल्याने काटकसर करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मे महित्यातच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. आणखी काही टँकरची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. पेयजलाला प्राधान्यया कालावधीत उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले शिवाय उन्हाचा परिणाम देखील पाण्याच्या साठ्यावर झाल्यामुळे टँकर सुरू करण्याची वेळ आली. गंगागूर, काश्यपी, गौतमी गोदावरी तसेच आळंदी या गंगापूर धरण समूहात सद्यस्थितीत ३४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी मे महिन्यात ४० टक्के इतका साठा शिल्लक होता. त्यामुळे शहरातील नागरिकांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता आहे. पालखेड तसेच गिरणा खोऱ्यातील मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये ११ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण जलसाठा ३० टक्के इतका असून मागील वर्षीच्या तुलनेत साठा पाच टक्क्यांनी कमी आहे. जिल्ह्यातील साठा (दलघफू)गंगापूर    ४९काश्यपी     १७गौतमी गोदावरी    १२आळंदी     १४पालखेड    १०करंजवण    १८वाघाड    ०४ओझरखेड     १३पुणेगाव     २८तिसगाव     १०दारणा     २५भावली     २८मुकणे     १३वालदेवी     ७२कडवा    १८नांदूरमध्यमेश्वर     १००भोजापूर     ११चणकापूर     ४०हरणबारी     ५३केळझर     २९नागासाक्या     ०६गिरणा     ३९पुनद     १४माणिकपुंज     ००

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणी