शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्त मुळ मालकांना जमिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:20 IST

वैतरणानगर : वैतरणा धरण लाभक्षेत्राबाहेरील जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी सरकार तयार असून, याबाबतचे धोरण जलसंपदा विभाग निश्चित करणार आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात यावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावू. सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.

वैतरणानगर : वैतरणा धरण लाभक्षेत्राबाहेरील जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी सरकार तयार असून, याबाबतचे धोरण जलसंपदा विभाग निश्चित करणार आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात यावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावू. सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.शनिवारी (दि.२५) वैतरणा येथे झालेल्या आढावा बैठकीत धरणग्रस्तांशी झालेल्या चर्चेप्रसंगी ते बोलत होते. वैतरणा धरण प्रकल्पबाधित शेतकºयांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, प्रकल्प पूर्ण होऊन ५० वर्षे झाली, धरणक्षेत्र सोडून ६२३ हेक्टर जागा पडून आहे. ती मूळ मालकांच्या नावावर नसल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. यात १५ गावांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जमीन मूळ मालकांना देताना लिलाव पद्धत नको, ती आहे त्या कुटुंबातील सदस्यांना मिळायला हवी. याउपर या तालुक्याची आठवण मुंबई-मराठवाड्याला केवळ पाण्यासाठी होते. मात्र बेरोजगार युवक, युवतींना नाशिक-मुंबई-मराठवाड्यात सरकारी नोकरीत प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने जाधव यांच्याकडे करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अलका अहिरराव, राजेंद्र शिंपी, विजय घोगरे, योगेश पाटील, नीलेश वन्नरे, शाखा अभियंता भूषण दळवी, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासोळे, जि. प. सदस्य उदय जाधव आदी उपस्थित होते.-----------------विद्युत उपकेंद्राला जागा देण्याची मागणीनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणाच्या पाण्यावर परिसरातील नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, कृष्णानगर, जानोरी, कुºहेगाव आदी गावांसह अनेक गावांतील शेती अवलंबून असून, परिसरातील शेतकºयांना पिकांना व्यवस्थित व व्यत्यय न येता पाणी वापरता यावे यासाठी या दारणा धरणाच्या पायथ्याशी वापरत नसलेली जमीन विद्युत उपकेंद्रासाठी देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांच्यासह शेतकºयांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक