शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘दाजी’ दानवेंचा नाशिकचे शेतकरी ‘साले’ करणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 14:39 IST

अतिथी देवो भव ही महाराष्टÑाची संस्कृती व परंपरा असून, त्यात अतिथी म्हणून जर जावई असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे महाराष्टÑाचे शेतकरी आपले कर्तव्य समजतो, या कर्तव्य, परंपरेशी बांधिलकी ठेवूनच नाशिकच्या दौ-यावर येत असलेले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा विशेष सत्कार करणार आहे.

ठळक मुद्देआज कार्यक्रम : शेतकरी सुकाणु समितीचा निर्णयशासकीय विश्रामगृहावर पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : नाशिका महापालिकेच्या विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नाशिक दौ-यावर येत असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांबाबत आजवर केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून शेतकरी संघटनांची सुकाणू समितीने त्यांचा शासकीय विश्रामगृहावर पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भात सुकाणू समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अतिथी देवो भव ही महाराष्टÑाची संस्कृती व परंपरा असून, त्यात अतिथी म्हणून जर जावई असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे महाराष्टÑाचे शेतकरी आपले कर्तव्य समजतो, या कर्तव्य, परंपरेशी बांधिलकी ठेवूनच नाशिकच्या दौ-यावर येत असलेले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा विशेष सत्कार करणार आहे. दानवे यांनी तूर खरेदी संदर्भात शेतकºयांना उद्देशून केलेल्या अवमानकारक शब्द प्रयोगाने परिस्थितीने बेजार झालेल्या शेतक-यांच्या भावना दुखावणारे होते, त्याच बरोबर विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान ‘लक्ष्मी’दर्शनाचा केलेले वक्तव्य लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडविणारे होते, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव गोळीबाराविषयी केलेले वक्तव्य पाहता अन्नदात्याविषयी त्यांच्या असलेल्या भावना व्यक्त होतात त्यामुळे शेतक-याचे ‘जावाई’ लागणा-या पाहुण्याचा विशेष सत्कार करण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला असून, त्या प्रित्यर्थ शनिवारी सकाळी शासकीय विश्रामगृह, त्र्यंबकरोड येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सत्कारात पाहुण्यांना वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेला बुक्का लावून औक्षण केले जाणार आहे, तसेच काळी शााल, काळे कपडे देवून सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकावर राजु देसले, हंसराज वडघुले, नाना बच्छाव, प्रकाश चव्हाण, किसन गुजर, यश बच्छाव, करण गायकर, गणेश कदम आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :BJPभाजपाagricultureशेती