शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:40 IST

कवडदरा : शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दूध व्यवसाय सध्या कमालीचा अडचणीत सापडला आहे. सध्या दुधाला २२ रुपये दर ...

कवडदरा : शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दूध व्यवसाय सध्या कमालीचा अडचणीत सापडला आहे. सध्या दुधाला २२ रुपये दर मिळत असल्याने पशुपालन करणे जिकिरीचे झाले आहे. आर्थिक मंदी व कोरोना संकट यात दूध व्यवसाय अधिकच अडचणीत येऊ लागला आहे. गेल्या पाच महिन्यांत पशुखाद्याच्या किमती वाढत चालल्याचे विदारक चित्र आहे.इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, भरवीर, पिंपळगाव डुकरा, घोटी खुर्द परिसरातील बहुतेक शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. दूध उत्पादकांच्या अडचणी दूर करण्याकरिता त्यांना अनुदान देणे गरजेचे आहे.गोल्डन क्रेडिट कार्ड म्हणून ओळख असलेल्या दूध व्यवसाय पुरता काळवंडला आहे. सध्या कोरोना महामारीच्या कचाट्यात दूध व्यवसायही नासला आहे. कधी काळी ३३ रुपयांपर्यंत गेलेला दुधाचा दर दहा रुपयांनी खाली आला आहे.ग्राहकांना मात्र ४४ रुपये प्रतिलिटर दूध विकत घ्यावे लागते. डिसेंबरमध्ये हजार, अकराशे रुपयांना मिळणारे ५० किलोचे पशुखाद्याचे पोते मात्र १८०० रुपयाला घेणे भाग पडते. आता पशुधन कसे संभाळावे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.कोरोनामुळे जनावराचे बाजार बंद असल्याने ते विकता येत नाहीत. उन्हाळ्यात हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. दुहेरी संकटाला दूध उत्पादक शेतकरी सामोरे जात आहेत. शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नांवर सरकार तसेच विरोधी पक्ष गंभीर नाही. त्यामुळे त्यांची घुसमट होत आहे.शेतकऱ्यांकडून २२ रुपये दराने गायीचे दूध खरेदी करून ग्राहकांना ४४ रुपये म्हणजे लिटरमागे तब्बल २२ रुपयांची नफारूपी मलई मधले दलाल खात आहेत. मोठ्या शहरात दूध विक्रेत्याला लिटरमागे किमान सहा रुपये कमिशन व १० लिटरवर १ लिटर दूध फ्री अशी १०:१ अशी स्कीम राबविली जात आहे. म्हणजे दूध विक्रेत्याला लिटर मागे १० ते १२ रुपये कमिशन मिळत आहे.- सचिन झनकर, दूध उत्पादक शेतकरी, भरवीर बु. (१८ मिल्क)

टॅग्स :milkदूधFarmerशेतकरी