शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

दादासाहेब फाळके स्मारकाचे रूपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 01:02 IST

नाशिक- भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्याच्या स्मारकाला आलेली अवकाळा थांबण्याची चिन्हे आहे. गेल्या काही वर्षात भग्नावस्थेत रूपांतरीत होत असलेल्या या स्मारकाला आता नवे रंग रूप देण्यात येणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात तब्बल दहा कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या स्मारकात फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी देखील तब्बल पाच कोटी रूपयंची तरतूद महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद: महापौरांनी केली पाच कोटींची तरतूद

नाशिक- भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्याच्या स्मारकाला आलेली अवकाळा थांबण्याचीचिन्हे आहे. गेल्या काही वर्षात भग्नावस्थेत रूपांतरीत होत असलेल्या या स्मारकाला आता नवे रंग रूप देण्यात येणार असून त्यासाठी अंदाजपत्रकाततब्बल दहा कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या स्मारकात फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी देखील तब्बल पाच कोटी रूपयंची तरतूद महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली.नाशिक महापालिकेने १९९९-२००० मध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे स्मारक साकारले आहे. याठिकाणी चित्ररूपाने त्यांचा जीवनपय साकारला आहे. याशिवाय संगीत कारंजे, उद्यान अशी आकर्षक रचना असल्याने सुरूवातीच्या काळात हे स्मारक नाशिककरांचे आणि पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले होते. याठिकाणी चित्रनगरी स्थापन करण्याची देखील वेळोवेळी तयारी करण्यात आली होती. मात्र, नंतर महापालिकेचे दुर्लक्ष होत गेल्याने स्मारकाची रया गेली. उद्याने सोडली तरी कारंजा आणि अन्य वास्तुंची दुरवस्था झाली आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्याने अपेक्षीत उत्पन्नापेक्षा कैकपटीने खर्च वाढला आहे. मात्र आधी महापौर सतीश कुलकर्णी आणि नंतर आयुक्त कैलास जाधव यांनी याठिकाणी भेट देऊन स्मारकाचे नुतनीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे.महापौर सतीश कुलकर्णी यांनी ७ फेबु्रवारीस भेट दिल्यानंतर स्मारकाच्या नुतनीकरणाबाबत सूचना करताना त्यात कला क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचनाजाणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात फाळके स्मारकासाठी वेगळी तरतूदनसल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षात फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पाच कोटी तर फाळके स्मारक आणि बुध्द स्मारक या दोन्हीस्मारकांचे नुतनीकरण करण्यासाठी दहा कोटी रूपयांची तरतूद करण्याची सूचना देखील केली होती. आता आयुक्त कैलास जाधव यांनी स्मारकाला भेट दिल्याने फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षात तरी स्मारकाचे नष्टचर्य संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या स्मारकात चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा पुतळा बसवावा अशी मागणी फिल्म सोसायटीने स्मारक बांधण्यापूर्वीच केली होती. परंतुमहापालिकेने आपल्या परीने काम करताना पुतळ्याचा विषयच वगळून टाकला होता. त्यानंतर आता तब्बल वीस वर्षांनी पुतळ्याचा विषय चर्चेत आला आहे.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त