शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचे वजन करून द्यावेच लागणार!

By admin | Updated: July 8, 2017 00:47 IST

नाशिक : घरगुती गॅसचोरीचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर शासकीय यंत्रणेने कारवाई करण्यास पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या घरगुती गॅसचोरीचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर जिल्हा शासकीय यंत्रणेने संबंधितांवर कारवाई करण्यास योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील जवळपास सर्वच एजन्सीधारकांना लेखी सूचना देत, प्रत्येक ग्राहकाला घरगुती गॅस सिलिंडरचे वजन करून द्यावेच लागेल; अन्यथा कारवाई केली जाईल अशी एकप्रकारची ताकीदच देण्यात आली आहे. ‘शहरात गॅसचोरीचे रॅकेट’ अशा मथळ्याखाली लोकमतने स्टिंग आॅपरेशन करून गॅसचोरी करणाऱ्या एजन्सी कर्मचाऱ्यांचा भांडाफोड केला होता. सातपूरमधील सोमेश्वर कॉलनी परिसरात स्वामी समर्थ गॅस एजन्सीचे कथित कर्मचारी दिवसाढवळ्या घरगुती गॅसची चोरी करीत असल्याचे ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. वास्तविक इतर राज्यातील अशाप्रकारचे व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत असल्याने, शहरातही असेच काहीसे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे प्राप्त झाल्या होत्या. तेव्हापासूनच याविषयीचा पाठपुरावा केला जात होता. अखेर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात ‘लोकमत’ला यश आले. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत तातडीने बैठक बोलावून शहरातील सर्वच एजन्सीधारकांना लेखी सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार ग्राहकाला घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण करताना त्याचे वजन करून देणे सक्तीचे असेल. त्याचबरोबर डिलिव्हरी बॉयकडून गॅस चोरी करण्यासाठी सिलिंडरचे सील काढण्याचे प्रयत्न केले जात असल्याने सिलिंडरचा वॉल्व्ह लिक होण्याची शक्यता असते. अशात सिलिंडरमधील बराचसा गॅस वाया जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे सिलिंडरचे वितरण करताना संबंधित डिलिव्हरी बंॉयला लिक डिटेक्टर मशीनने सिलिंडरची तपासणी करूनच ते ग्राहकांना द्यावे लागणार आहे. जर असे करण्यास संबंधित कर्मचाऱ्याने नकार दिल्यास, त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचेही जिल्हा पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गॅस वितरक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांची भेट घेऊन त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांविषयीचे निवेदन दिले. या निवेदनात सिलिंडर वितरणासाठी कर्मचारी नियुक्त करताना येत असलेल्या अडचणी, तसेच या क्षेत्रात फोफावत असलेली गुंडगिरी याचा उल्लेख या निवेदनात केला आहे.