शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सायकलिंग परिक्रमा : नाशिक पोलीस आयुक्तालय-वायुसेनेचा संयुक्त ‘प्रयास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:20 IST

पोलीस आयुक्तालय व वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक-नागपूर-नाशिक अशी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्र मेला २२ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयातून प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्दे११ दिवसांच्या या मोहिमेत १२ सायकलपट मोहिमेत सहभागी सुमारे १,६०० किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले

नाशिक : वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी पोलीस आयुक्तालय व देवळाली येथील वायूसेना केंद्राच्या वतीने ‘प्रयास सायकलिंग परिक्रमा’ हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत दोन्ही दलाचे प्रत्येकी सहा सायकलपटूंनी मोहिमेत सहभागी होऊन १,६०० किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले.पोलीस आयुक्तालय व वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक-नागपूर-नाशिक अशी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्र मेला २२ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयातून प्रारंभ करण्यात आला. ११ दिवसांच्या या मोहिमेत १२ सायकलपटूंनी सुमारे १,६०० किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. या मोहिमेत वायुसेनेचे स्कॉर्डनप्रमुख संतोष दुबे, लेफ्टनंट सुमित, नितीन पाटील, सार्जेंट संजय, कॉरपोरल समीउल्ला, एस. जाधव, रविंदर, एअरक्राफ्टमॅन धीरज, सुमित, मनदीप यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, बाळकृष्ण वेताळ, नंदू उगले, सुदाम सांगळे, किरण वडजे, दिनेश माळी, हर्षल बोरसे, एम. धूम, संदीप भुरे, फुलचंद पवार हे सहभागी झाले होते.मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात या सायकलिस्ट अधिकारी-कर्मचा-यांनी चांदवड येथील नेमिनाथ जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षाविषयी माहिती देत तरुणाईचे प्रबोधन केले. तसेच वायुसेनेत भरती होण्यासाठी करावयाची तयारी व पात्रतेविषयीची माहिती दुबे यांनी दिली. प्रवासादरम्यान त्यांनी विविध महाविद्यालयांना भेटी देत गावपातळीवरील प्रमुख चौकांमध्ये थांबून नागरिकांचे रस्ता सुरक्षाविषयी प्रबोधन केले. शेगाव येथील गजानन महाराज देवस्थान परिसरात सायकलपटूंचा हा समूह तिसºया दिवशी दाखल झाला. सहाव्या दिवशी सायकलपटू नागपूर शहरातील सोनगाव वायुसेनेच्या केंद्रावर पोहचले. तेथे एअर व्हाइस मार्शल एम. सिंग यांनी सायकलपटूंच्या रॅलीला झेंडा दाखविला.

दहाव्या दिवशी सायकलपटूंचा समूह जालनावरून शिर्डीमार्गे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात पोहचला. अकराव्या दिवशी शिर्डी येथून सायकलपटू नाशिकच्या दिशेने रवाना झाले. सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास सर्व सायकलपटूंचा रस्ता सुरक्षेविषयी प्रबोधनाचा ‘प्रयास’ पूर्णत्वास आला.

टॅग्स :airforceहवाईदलnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयroad safetyरस्ते सुरक्षा