शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जाहीरातीतून दोघा आमदारांचा पत्ता कट

By श्याम बागुल | Updated: October 15, 2018 15:35 IST

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षही कामाला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एका खासगी संस्थेमार्फत राज्यातील आमदारांच्या कामाबाबत कानोसा घेण्यात आला असता, त्यात

ठळक मुद्देपक्ष कार्यकर्ते संभमात : प्रदेशच्या नेत्यांचा आर्थिर्वाद आमदार सीमा हिरे व मध्यच्या देवयानी फरांदे यांना जाणिवपुर्वक टाळण्यात आले

नाशिक : काही सत्ताधारी आमदारांची रिपोर्ट कार्ड खराब असल्याच्या चर्चेत नाशिक जिल्ह्यातील दोघा आमदारांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात असताना नाशिक दौऱ्यावर मराठा वसतीगृह उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताप्रित्यर्थ भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतून शहरातील दोघा आमदारांचे छायाचित्र व नावे जाणिवपुर्वक टाळण्यात आल्याने या संदर्भातील चर्चा अधिकच गडदपणे होवू लागली आहे. पक्ष श्रेष्ठींच्या आशिर्वादानेच विद्यमान आमदारांना जाहीरातीतून दूर ठेवण्यात आल्याचा अंदाज काढला जात आहे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षही कामाला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एका खासगी संस्थेमार्फत राज्यातील आमदारांच्या कामाबाबत कानोसा घेण्यात आला असता, त्यात नाशिक जिल्ह्यातील भाजपातील दोघा आमदारांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. या अहवालात आमदारांची नावे असली तरी, ती पक्षाने उघड केलेली नाहीत, मात्र त्याचा आधार घेवून प्रत्येक आमदाराच्या कामकाजाकडेच संशयाने पाहिले जात आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार असून, त्यातील राहूल अहेर हे ग्रामीण भागातून निवडून आले आहेत. शहरात तीन आमदार असल्याने त्यातील दोन कोण असा प्रश्न कार्यकर्ते पक्षांतर्गंत विचारू लागले आहेत. खुद्द तिघा आमदारांकडूनही याबाबतची चाचपणी केली जात असताना त्या पार्श्वभुमीवर रविवारी नाशिक दौ-यावर आलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या स्वागताच्या जाहीरातीवरून आमदारांच्या कामकाजाबाबतची चर्चा अधिक ठळकपणे करण्यात आलाी आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका जाहीरातीतून पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे व मध्यच्या देवयानी फरांदे यांना जाणिवपुर्वक टाळण्यात आल्याचे अधोरेखित झाले आहे. शहरातील महापालिकेतील पदाधिकारी व पक्षाचे प्रदेश पदाधिका-यांचे छायाचित्रासह नावे प्रसिद्ध केलेली असताना हिरे, फरांदे यांना त्यातून वगळण्याची बाब अनेक कार्यकर्त्यांना खटकली आहे. त्यामुळे त्यातून अनेक अर्थ काढले जात असून, ज्या दोन आमदारांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त केले जात आहे, त्यातील तर हे दोघे नसावेत असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळे शहरातील दोघा आमदारांना जाहिरातीतून डावलण्याची कृती पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय होवू शकत नसल्याची कार्यकर्त्यांना खात्री आहे. त्यामुळे या साºया प्रकाराला वरिष्ठांचा आशिर्वाद मानला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक