शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

हक्कांप्रती जागृत राहिल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही : मलिंद सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 18:04 IST

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे अर्थव्यवस्थेतील पंचप्रमाणे असलेल्या घटकांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पंचप्राण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  

नाशिक :ग्राहकाने आपल्या हक्क अधिकारांप्रती जागृत राहून वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व फसणुकीच्या प्रकारांविरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर आपली बाजू मांडली तर ग्राहकांना निश्चित न्याय मिळून फसवणुकीचे प्रकारही नियंत्रित होऊन ग्राहकांचे हित जपले जाऊ शकेल. त्यासाठी ग्राहक संरक्षणासाठी झटणाऱ्या संस्थांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केले. ग्राहक ाच्या हक्कांविषयी अधिकारांची जागृती करताना नवीन ग्राहक संरक्षण कायद्यातील सुधारणांविषयी ग्राहकांना अवगत करण्याची त्यांची फसणूक टाळता येणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. नाशिक जिल्हा पुरवठा विभाग व ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेतील आदर्श पंचप्राण पुरस्कारांसह राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवड्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या शालेय व महाविद्यालयी वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यासपीठावर सहायक पुरवठा अधिकारी पंकज पवार, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभाग प्रमुख अरुण भार्गवे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, दत्ता शेळके आदी उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे यांनी रेरा कायदा व गृहनिर्माण संस्थाच्या नोंदणीकरणाविषयीच्या समस्या उपस्थित करताना याविषयी ग्राहकांमध्ये जागृती होण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन डॉ. लता पवार यांनी केले. आभार धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी मानले. दरम्यान, नाशिकरोड येथील  बिंदू रामराम देशमुख महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी ग्राहक जागृती, चंगळवादी ग्राहकांची निर्मिती आणि महागाई आदी विषयांवर जागृती करणारे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर अन्न व औषध प्रशासन, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, आरटीओ, कृषी व वजन मापे विभाग यांनी नियोजन भवनच्या आवारात माहितीपर प्रदर्शनातून ग्राहक जागृती केली.  

पंचप्राण पुरस्कारार्थी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे अर्थव्यवस्थेतील पंचप्रमाणे असलेल्या घटकांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पंचप्राण पुरस्काराने सन्मान केला. यात मालेगावचे महिंद्र पवार यांना आदर्श शेतकरी, नाशिकचे देवेंद्र कुकडे यांना आदर्श व्यापारी, जयंत राऊत यांना आदर्श कारखानदार, सुनील माळी यांना आदर्श श्रमिक व उदय कुलकर्णी यांना आदर्श ग्राहक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

टॅग्स :consumerग्राहकNashikनाशिक