शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

नाशिकरोडला ग्राहकांची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:56 IST

नाशिकरोड : सरकारने राज्यातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय निर्णय घेतल्याने सोमवारी (दि.४) दुपारी नाशिकरोड परिसरातील देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर शेकडो तळीरामांनी गर्दी केली.

नाशिकरोड : सरकारने राज्यातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय निर्णय घेतल्याने सोमवारी (दि.४) दुपारी नाशिकरोड परिसरातील देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर शेकडो तळीरामांनी गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत मद्यविक्रीची दुकाने बंद करून सर्वांना या भागातून हटविण्याची कारवाई केली.सोमवारी सकाळी ९ वाजेपासून नाशिकरोड परिसरातील देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानाजवळ तळीरामांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त न झाल्याने दुपारपर्यंत दुकाने सुरू झालेली नव्हती. दरम्यानच्या काळात मद्यपींची होत असलेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना वारंवार सूचना करून गर्दी हटवावी लागत होती. मात्र दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुकाने उघडली गेली. दुकाने उघडताच परिसरातील मद्यपींच्या लांबच लांब रांगा लागल्या. कोरोनाच्या संदर्भात असलेले नियम, फिजिकल डिस्टन्स, दुकानात ठेवायचे सॅनिटायझर या सर्व गोष्टींना हरताळ फासला गेला. मद्यपिंची वाढत चाललेली गर्दी त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याच्या सूचना देत दुकानाच्या बाहेर गर्दी हटविण्यास सुरुवात केली. दुकानांबाहेरील गर्दी हटविताना पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. तरीही अनेकजण लपून दुकाने पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असल्याने अखेर पोलिसांनी गल्लोगल्ली दुचाकीवर गस्त घालत तळीरामांना हुसकावून लावले, तर दुकानदारांना दुकाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू होत नसल्याचे तळीरामांच्या लक्षात आल्याने त्यांची घोर निराशा झाली होती.  दरम्यान, दारूसाठी गर्दी लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिक व महिलांनी लॉकडाउन संपेपर्यंत देशी-विदेशी दारूची विक्री सुरू करू नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक