शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक दिन बैठकीला अधिकाऱ्यांचीच दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:35 IST

देवळा तालुक्यातील अधिकारी वर्गाने ग्राहक दिनाकडे पाठ फिरविल्यामुळे ग्राहक चळवळीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी केल्यानंतर तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी बैठक तहकूब केली. यावेळी ग्राहकांप्रति अनास्था दाखविणाºया अधिकाºयांचा निषेध करण्यात आला. तहकूब झालेली बैठक १३ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदेवळ्यात बैठक तहकूब : ग्राहकांप्रति अनास्था दाखविणाऱ्यांचा निषेध

देवळा : तालुक्यातील अधिकारी वर्गाने ग्राहक दिनाकडे पाठ फिरविल्यामुळे ग्राहक चळवळीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी केल्यानंतर तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी बैठक तहकूब केली. यावेळी ग्राहकांप्रति अनास्था दाखविणाºया अधिकाºयांचा निषेध करण्यात आला. तहकूब झालेली बैठक १३ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.गेल्या दि. २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी देवळा तालुका ग्राहक पंचायतीची रद्द झालेली बैठक ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार शेजूळ यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवळा तालुका ग्राहक पंचायतीचे संघटक संजय मांडगे, सहसंघटक संजय देवरे, निंबाजी अहेर, मोबीन तांबोळी, राजपाल अहिरे, संजय भदाणे, शशिकांत चितळे आदी ग्राहक मंचचे सदस्य उपस्थित होते. परंतु बैठकीस महसूल विभागाव्यतिरिक्त तालुक्यातील पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, तालुका कृषी कार्यालय, वैध मापन, खते, बी-बियाणे विक्र ेते, बँक, मुद्रांक विके्रते आदी ग्राहकांशी सर्वाधिक संबंध येणाºया कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयांतील एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्राहक पंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली व ग्राहक चळवळीचा उद्देश सफल होत नसल्यामुळे बैठक तहकूब करण्याची मागणी केली. यावेळी चर्चा होऊन तहसीलदार शेजूळ यांनी सदर बैठक तहकूब केली. तसेच अनुपस्थित अधिकाºयांना नोटिसा काढण्याचे आदेश दिले. सदरची बैठक १३ जानेवारी रोजी सर्व अधिकाºयांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.ग्राहकांशी संबंधित असलेल्या सर्व विभागांना ग्राहक दिनाला उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले होते; परंतु बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे त्यांना नोटीस देणार आहे. ग्राहक पंचायत सदस्यांच्या मागणीनंतर ग्राहक दिनाची बैठक तहकूब केली आहे. १३ जानेवारी रोजी सर्व अधिकाºयांच्या उपस्थितीत ही बैठक पुन्हा घेण्यात येईल.- दत्तात्रेय शेजूळ, तहसीलदार, देवळा

टॅग्स :Tahasildarतहसीलदार