शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मद्यपींवर ‘एक्साइज’ ठेवणार करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आठवडाभरानंतर चालू वर्षाची अखेर होणार आहे. यामुळे मद्यपींकडून आतापासून ‘थर्टि फर्स्ट सेलिब्रेशन’चे बेत आखण्यास ...

ठळक मुद्दे२४ तास तपासणी नाके : प्रतिबंधित मद्यतस्करी रोखण्यासाठी नऊ भरारी पथके

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठवडाभरानंतर चालू वर्षाची अखेर होणार आहे. यामुळे मद्यपींकडून आतापासून ‘थर्टि फर्स्ट सेलिब्रेशन’चे बेत आखण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात परराज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये निर्मित मद्यसाठ्याची तस्करी होण्याची दाट शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिक विभागाच्या स्तरावर नऊ भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. तसेच मद्यप्राशन करण्यापूर्वी नागरिकांनाही तात्पुरता परवाना वैयक्तिक तसेच सेलिब्रेशन पार्टीचा आॅनलाइन पद्धतीने अर्ज करून उत्पादन शुल्क विभागाकडून मिळवावा लागणार आहे.शहरासह जिल्ह्यात सीमावर्ती भागातून होणारी मद्याची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. थर्टि फर्स्ट सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली असल्यामुळे उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाले आहे. नागरिकांच्या जीविताला बनावट मद्यापासून धोका पोहचू नये तसेच शासनाच्या महसुलावर परिणाम होऊ नये, म्हणून उत्पादन शुल्क विभागाने तपासणी नाके २४ तास जिल्ह्यांच्या सीमांवर कार्यान्वित केले आहे. तसेच भरारी पथकदेखील नियुक्त करण्यात आले आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक हॉटेल्समध्ये आॅर्केस्ट्रासह मद्यपार्टी, डिनरची खास व्यवस्था केली जाते. बहुतांश नाशिककरांना अशा हॉटेल्स दरवर्षी आकर्षित करत असतात. थर्टि फर्स्टच्या औचित्यावर परराज्यात निर्मित झालेले मद्य तसेच बनावट मद्याच्या तस्करीची शक्यता लक्षात घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकांमार्फत सीमांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. अंबोली, हरसूल, रासबारी, बोरगाव, सुरगाणा, पेठ आदी भागात जिल्ह्याची ३ तर विभागाची ६ अशी एकूण ९ भरारी पथक लक्ष ठेवून आहेत. तसेच या परिसरात २४ तास सीमावर्ती नाके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागPoliceपोलिस