मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करून येत्या ४ महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. याची ग्रामीण भागाच एकच चर्चा सुरू असून, नवीन निवडणुका कधी लागतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. मालेगाव बाजार समितीवर कॉँग्रेस नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ होते ते हटवून युती शासनाने सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा- सेना पदाधिकाऱ्यांचे प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त केले होते. सदर प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्ती विरोधात मालेगाव बाजार समितीचे तत्कालीन प्रशासकीय अध्यक्ष प्रसाद हिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती रद्द करून बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात, अशी विनंती केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव कृउबाचे प्र्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करत येत्या चार महिन्यांच्या आत संचालक मंडळ निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)निवडणुका झाल्यावर कुणाचे संचालक मंडळ कारभार हाती घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
मालेगावी बाजार समिती निवडणुकीबाबत उत्सुकता
By admin | Updated: October 12, 2015 23:23 IST