शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

संचारबंदीचे उल्लंघन; २१६ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:36 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाºया सिन्नर तालुक्यातील २१६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच १२८ दुचाकी व १८ चारचाकी सिन्नर, एमआयडीसी व वावी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आल्या आहेत. शासनाचे आदेश मोडणाºया सिन्नरच्या चार किराणा दुकानदारांसह एका सलून व्यावसायिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देचार किराणा दुकानदारांसह सलून व्यावसायिकाचा समावेश

शैलेश कर्पे ।सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाºया सिन्नर तालुक्यातील २१६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच १२८ दुचाकी व १८ चारचाकी सिन्नर, एमआयडीसी व वावी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आल्या आहेत. शासनाचे आदेश मोडणाºया सिन्नरच्या चार किराणा दुकानदारांसह एका सलून व्यावसायिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कोरोनाच्या संसर्गाचा प्रकोप जसजसा वाढतो आहे, तसतशी धडकी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना भरत आहे. तरीदेखील कर्तव्य म्हणून देशहितासाठी आपली जबाबदारी पार पाडण्यास ते सज्ज आहेत. अशात लॉकडाउन तोडणाऱ्यांना आवरण्याची कसरत पोलिसांना करावी लागत असल्याचे चित्र आहे. देशावर कोरोनाचे संकट असताना विविध कारणे सांगून घराबाहेर पडणाºया विरोधात सिन्नर तालुक्यातील सिन्नर, वावी व एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम उघडली आहे.जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे, वावीचे सहायक निरीक्षक रणजित गलांडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. १२८ दुचाकी व १८ चारचाकी जप्त करूनही विविध कारणे सांगून घराबाहेर पडणाºयांचे प्रमाण कमी होत नसल्याचेही दिसून येत आहे.लॉकडाउनच्या काळात सिन्नर पोलीस ठाण्यात १०५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७५ दुचाकी व चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वावी पोलीस ठाण्यात ८१ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४४ दुचाकी तर ८ चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० गुन्हे नोंदविण्यात आले असून ८ दुचाकी, व १ चारचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.सिन्नरला गेल्या ८-१० दिवसांत पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी व कार लावण्यासाठी पोलीस ठाण्याजवळील जागाही आता अपूरी पडू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात बसणे हाच एकमेव उपाय असून त्याबाबत देशभर जनजागृती करण्यात येत आहे.नगर परिषद, ग्रामपंचायतस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. यात सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणेवर आहे. कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये यासाठी २४ तास पोलीस फिरत आहेत. प्रत्येकाची समजूत घालत त्यांना घरातच बसण्यासाठी आग्रह करत आहेत. सारखे घराबाहेर भटकणाºयांना कधी उठा-बशांची शिक्षा तर कधी काठ्यांचा प्रसादही देत आहेत. दुचाकीस्वाराच्या मागे पोलीस बसून थेट त्यांची वरात पोलीस ठाण्यात नेत आहेत. तेथे संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करून मोटारसायकल जप्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्व जप्त केलेल्या मोटारसायकली पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला लावण्यात येत असून, या मोटारसायकली लावण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. सिन्नर शहरात ९ कार चालकांविरोधातही अशीच कारवाई करण्यात आली असून, या कारही जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मोटारसायकलचालकांच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल करण्यात आले असून, या सर्व मोटारसायकल्स सांभाळण्याची वेळ पोलिसांवरच आली आहे.च्जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने दुपारी ४ वाजेनंतर किराणा दुकान बंद ठेवणे गरजेचे असताना चार किराणा दुकानदार दुपारी ४ वाजेनंतर दुकान उघडे ठेवून गिºहाईक करीत असल्याने चार किराणा दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एक सलून दुकानदार गिºहाईक घरी बोलावून कटिंग व दाढी करताना मिळून आल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस