शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या संस्कारातून संस्कृती टिकणार :  रामकृष्ण महाराज लहवितकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:58 IST

आडगाव : देशात व्यभिचार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे देशाला सुसंस्कृतबरोबर सुसंस्कारित पिढीची गरज आहे. नव्या पिढीला संस्कार मिळाले ...

आडगाव : देशात व्यभिचार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे देशाला सुसंस्कृतबरोबर सुसंस्कारित पिढीची गरज आहे. नव्या पिढीला संस्कार मिळाले तरच भारतीय संस्कृती टिकणार आहे. चांगल्या संस्कारातूनच देशाची संस्कृती टिकणार आहे, असे विचार आचार्य महामंडलेश्वर विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी मांडले. मानूर येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. नगरसेवक उद्धव निमसे अध्यक्षस्थानी होते.मानूर येथे झालेल्या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर, नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेवक शीतल माळोदे, माजी नगरसेवक शिवाजी निमसे, नांदूर-मानूर सोसायटीचे सभापती सोमनाथ हांबरे, साहेबराव गायकवाड, राजू लवटे, भाऊसाहेब निमसे, अ‍ॅड. नितीन माळोदे, सुरेश निमसे, सुनील आडके आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव निमसे, साहेबराव गायकवाड, खासदार गोडसे, आमदार सानप, शिवाजी चुंभळे, सुनील आडके, संभाजी मोरुस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय माळोदे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वसंत श्री तुकोबाराय सेवाभावी टस्टचे अध्यक्ष प्रभाकर माळोदे यांनी आभार मानले.गावोगावी हनुमानाच्या मंदिराची उभारणीडॉ. रामकृष्ण लहवितकर म्हणाले, हनुमान हे शक्ती, ज्ञान, बुद्धी, सदाचार यांचे प्रतीक आहे. म्हणूनच गावोगावी हनुमानाच्या मंदिराची उभारणी केली गेली आहे. मंदिराच्या माध्यमातून मानूरगावाला भक्तीचे संस्कार मिळाले आहे. गोदाकाठची जी गावे आहेत, त्यांचा रामायण काळात उल्लेख आढळतो. अशा प्रकारचे येथील भूमीचे वैशिष्ट्य आहे. येथे जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. नवीन मंदिर उभे करणे एकवेळ सोपे काम आहे. मात्र, जुन्या मंदिराचे काम करणे अवघड असते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक