शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सांस्कृतिक मेजवानी : जिल्हा प्राथमिक फेरीत घेता येणार भरगच्च नाट्यप्रयोगांचा आस्वाद उद्यापासून बालनाट्य स्पर्धेची वाजणार तिसरी घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:42 IST

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सोमवार (दि. ८) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सोमवार (दि. ८) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस चालणाºया या नाट्ययज्ञात २५ हून अधिक नाट्यप्रयोगांची मेजवानी नाशिककर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरी अंतर्गत सोमवारी (दि. ८) विंध्यवासिनी बालविद्या संस्थेचे ‘अशी पाखरे येती’, वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिराचे ‘ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ‘एक रात्र भुताची’, सूर्या शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे ‘मोबाइल नको रे बाबा’ तर स्वामिनारायण इंग्लिश मीडिअम स्कूलतर्फे ‘वाºयावरची वरात’ तर मंगळवारी (दि. ९) ओम साई सच्चिदानंद सामाजिक संस्थेचे ‘ड्रायव्हर’, श्रीरंगनगर मित्रमंडळाचे ‘घरटे’, प्रबोधिनी ट्रस्टचे ‘आभासी जग’, अभिनव बालविकास शाळा नं. १ यांचे ‘अदिबाबाच्या बेटावर’, अभिनव बालविकास शाळा नं. २ यांचे ‘श्यामची आई’, सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर यांचे ‘एलियन्स दि ग्रेट’ तसेच बुधवारी (दि. १०) मेनली अ‍ॅमॅच्युअर्स संस्थेचे ‘मला मोठं व्हायचं’, मानवधन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे ‘याला जबाबदार कोण’, नवीन मराठी शाळा नाशिकरोड संस्थेचे ‘लालयेत पज्चवर्षाणि’, ओम गुरूदेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुकुल अहमनगर शाळेचे ‘राजा शिवबा’, ओम गुरू देव इंग्लिश मीडिअम स्कूल अहमदनगर यांचे ‘दांडगी मुलं’ आदी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (दि. ११) रचना विद्यालय नाशिक यांचे ‘वन वे’, लोकहितवादी मंडळाचे ‘दशावतार’, कृपा शैक्षणिक सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे ‘लेट्स बिगीन’, इंदिरा भारती कर्णबधिर निवासी विद्यालय इगतपुरी यांचे ‘झीरो बन गया हीरो’, ग्लोबल व्हिजन इंग्लिश स्कूल यांचे ‘पाण्यापायी पडला घाव’, शुक्रवारी (दि. १२) दीपक मंडळ सांस्कृतिक विभागाचे ‘गोट्या’, विद्या प्रबोधिनी प्रशालेचे ‘ताटी उघडा’, बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव, अहमदनगरचे ‘सिद्राम सुडोकू’, अश्वमेध थिएटर्सचे ‘चौदाशे भागिले चौदा’ तर स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (दि. १३) कलाभ्रमंती संस्थेचे ‘ट्रॅजेडी’, अग्नेय गुरुकुल लोकसेवा प्रतिष्ठान, अहमदनगर यांचे ‘मी एक बोन्साय’, आत्मा मालिक इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अहमदनगर यांचे ‘झेप’ तर अहमदनगर जिल्हा हौशी नाट्यसंघाच्या ‘मुलाकात’ या नाटकाने स्पर्धेची सांगता होणार आहे.