शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

निऱ्हाळे परिसरात मशागतीची कामे पूर्ण; पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:14 PM

निऱ्हाळे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीपपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. मृग नक्षत्रास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.

ठळक मुद्देशासनाने मदतीचा हात देण्याची मागणी परिसरातील शेतकरीवर्गाने केली आहे.

निऱ्हाळे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीपपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. मृग नक्षत्रास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने संचारबंदी केल्याने शेतकऱ्यांनी आपले लक्ष शेतीकडे केंद्रित केले होते. खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे आटोपून घेतली आहेत. दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी होऊन बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यात गुंतले आहेत. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पाठीमागे आर्थिक संकट उभे राहिले आहे. प्रथम दुष्काळ व नंतर मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस यामुळे खरीप व रबी असे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. तर यावर्षीही सुरुवातीलाच कोरोनाचे संकट सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नुकतेच निर्बंध हटविल्याने ग्रामीण भागात शेतीची कामे चालू झाली आहेत.रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून मृगाच्या पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर लागली आहे. मशागतीचे काम उरकून घेतले आहे. मृगाच्या पावसाने हजेरी लावली की, पेरणीला सुरुवात होईल; परंतु मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पावसाचा थेंब नाही. तसेच कडक उन्हाळा सुरू झाला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. ‌‌‌ ‌सध्यातरी शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. अनेकांनी यंदा सोयाबीन पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण गोडतेलाचे वाढते भाव गगनाला भिडले असल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लॉकडाऊन काळात शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामासाठी पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी परिसरातील शेतकरीवर्गाने केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती