शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

केंद्राने मदत देऊनही राज्याकडून ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:47 IST

नाशिक : केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा केला आहे. राज्य शासनाने त्याचे नियोजन करून जिथे ...

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : बाधितांच्या तुलनेत रेमडेसिविर, ऑक्सिजन कमी

नाशिक : केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा केला आहे. राज्य शासनाने त्याचे नियोजन करून जिथे बाधित जास्त तिथे त्याचे वाटप अधिक होणे आवश्यक होते. मात्र, नाशिकला बाधित संख्या प्रचंड प्रमाणात असूनही पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. कोटा अपुरा असल्याने तो वाढवण्याची गरज असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह बिटको रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते बोलत होते. फडणवीस यांनी केंद्र शासनाने गंभीर रुग्णसंख्या आणि मागणी या बाबीचा विचार करून सर्व राज्यांसाठी नियोजन केले असल्याचे सांगितले. लसींचे उत्पादन अधिक करता यावे, यासाठी केंद्राने सीरमला ३ हजार कोटी, तर भारत बायोटेकला १,५०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे सीरम महिन्याला १० कोटी, तर भारत बायोटेक महिन्याला ६ कोटी लसींचे डोस तयार करू शकणार आहे. 

राज्य शासनालादेखील मे महिन्यापासून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होऊ शकणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्याशिवाय पंतप्रधान केअर फंडमधून नाशिकला ४ ऑक्सिजन प्लांट बसवले जाणार आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात नाशिकला रुग्णांच्या वाढत्या  संख्येनुसार ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा तात्काळ होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी राज्य शासनाने नाशिकचा दोन्हींचा कोटा वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काही मंत्री आणि वजनदार नेते त्यांच्या जिल्ह्यात हे साठे पळवत असल्याचे आरोप होत असून, अशा मंत्र्यांना एकच विनंती आहे, त्यांनी जिथे जास्त बाधित आहेत, जिथे जास्त गरज आहे, अशा जिल्ह्यांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कारण मंत्री हे केवळ जिल्ह्यापुरते नसून संपूर्ण राज्याचे असतात, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

नाशिकला मिळणार २ ऑक्सिजन टँकर नाशिकमधील रुग्ण बाधित होण्याचा दरदेखील ३० टक्क्यांवर गेला असून, हा रेट खूप अधिक आहे. त्यामुळेच नाशिकला अधिकाधिक रेमडेसिविर मिळावेत, यासाठीदेखील आम्ही प्रयत्न करीत आहोत, तसेच नाशिकला रिलायन्स आणि जिंदाल या कंपन्यांकडून २ ऑक्सिजन टँकर मिळण्याची व्यवस्था केली असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले, तसेच सद्य:स्थितीत राज्याने केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण न करता जनतेसाठी कार्य करावे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. त्याबाबत बोलायचे नाही माझा नाशिक दौरा कदाचित जिल्हा प्रशासनाला माहिती नसल्याने मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले असावे. मात्र, बैठकदेखील महत्त्वाची असल्याने माझी विभागीय आयुक्त आणि सिव्हिल सर्जनवगळता अन्य कुणाशी भेट होऊ शकली नाही. तरीदेखील त्याबाबत मला काहीही बाेलायचे नसल्याचे सांगून या शह-काटशहच्या राजकारणाबाबत बोलणे फडणवीस यांनी टाळले.

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्या