शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

निवडणूक कामात कुचराई, दोघांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 01:16 IST

लोकसभेची मतदानप्रक्रिया पार पडण्यापूर्वी मतमोजणीची तयारी करणाऱ्या निवडणूक यंत्रणेची अनेक कामे महिना उलटूनही पूर्ण झाली नसून, मंगळवारी निवडणूक निरीक्षकांसमक्ष मतदान केंद्रातील सुविधांची पाहणी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना या गैरसोयीबद्दल धारेवर धरत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नाशिक : लोकसभेची मतदानप्रक्रिया पार पडण्यापूर्वी मतमोजणीची तयारी करणाऱ्या निवडणूक यंत्रणेची अनेक कामे महिना उलटूनही पूर्ण झाली नसून, मंगळवारी निवडणूक निरीक्षकांसमक्ष मतदान केंद्रातील सुविधांची पाहणी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना या गैरसोयीबद्दल धारेवर धरत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर चांदवडचे प्रांत तथा सहायक निवडणूक अधिकारी संदेश भंडारे यांनी निवडणूक कामात कुचराई केल्याच्या कारणावरून त्यांनाही नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. दरम्यान, मंगळवारी घेण्यात आलेली रंगीत तालीम यशस्वी झाली आहे.  मतमोजणी अधिकारी, कर्मचाºयांना उन्हाची चांगलीच झळ बसली आहे.मंगळवारी देशपातळीवर एकाच वेळी मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. मतमोजणी करताना येणाºया अडचणी लक्षात येण्याबरोबरच निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सर्व्हरची चाचणी घेण्यासाठी सकाळी ८ वाजता मतमोजणीची तालीम करण्यात येऊन आयोगाच्या सुविधा अ‍ॅपवर मतमोजणीची आकडेवारी भरून पाहण्यात आली. तत्पूर्वी सकाळी ७ वाजेपासूनच सर्व अधिकारी व कर्मचाºयांना सेंट्रल वेअर हाउस येथे हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे व अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्या उपस्थितीत एक तास रंगीत तालीम यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मात्र निवडणूक निरीक्षकांनी आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे मतमोजणी केंद्रात व परिसरातील सुविधांचा आढावा घेतला असता, त्यात अनेक बाबी उघडकीस आल्या. मतमोजणी केंदातील सुविधांची व्यवस्था महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यावर सोपविण्यात आली होती. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षकांनी वेळोवेळी मतमोजणी केंद्राला भेट देऊन अनेक बाबी सुचविल्या होत्या. मंगळवारी निवडणूक निरीक्षकांनी त्याची पाहणी केली असता, अनेक उणिवा दिसून आल्या. त्याचप्रमाणे अनेक कामे अपूर्ण असल्याचे दिसल्याने निवडणूक निरीक्षकांनी नापसंती व्यक्त करून जिल्हाधिकाºयांना जाब विचारला. त्यावर थविल यांना विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी दिलेले उत्तरामुळे समाधान न झाल्याने जिल्हाधिकाºयांनी त्यांना थेट लेखी नोटीस बजावली आहे. त्यात त्यांना सक्तताकीद देण्यात आली असून, मतमोजणी केंद्रातील सुविधांमध्ये उणीव दिसल्यास जबाबदार धरण्यात येईल, असे म्हटले आहे.दरम्यान, जिल्ह्णात आगामी तीन दिवस उष्णतेची लाट असून, त्याचा पहिला फटका मतमोजणी कर्मचारी, अधिकाºयांना बसला आहे. मतमोजणी होणारे सेंट्रल वेअर हाउस चोहोबाजूंनी बंदिस्त असून, छतावर लोखंडी पत्रे टाकण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत हजारो कर्मचारी, अधिकाºयांना बंदिस्त गुदामात मतमोजणी करावी लागणार आहे. मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत रंगीत तालिमीच्या निमित्ताने जमा झालेले अधिकारी, कर्मचारी उष्णतेने घामाघूम झाले. मतमोजणीच्या दिवशी जवळपास २४ तास त्यांना तेथेच राहावे लागणार असल्याने प्रशासनाने पुरेशा सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.गैरहजर अधिका-याला नोटीसदिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक अधिकारी संदेश भंडारे यांनाही जिल्हाधिकाºयांनी नोटीस बजावली असून, त्यात त्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, आयोगाने औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या मतमोजणी प्रशिक्षणाला गैरहजर राहिले. त्याचबरोबर निवडणुकीच्या व्हिडीओ कॉन्फरसिंगला गैरहजर राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक कामाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सध्या पदावर कार्यरत राहण्यासाठी सक्षम नसल्याचा ठपका ठेवून त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर का करण्यात येऊ नये अशी विचारणा नोटिसीत करण्यात आली आहे..

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिक