नाशिकरोड : बिटको महाविद्यालयामागील जगताप मळा येथे आपल्या दोन कोवळ्या निष्पाप मुलांचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून करून त्यानंतर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत गंभीर जखमी झालेल्या सुनील बेलदार या क्रूर पित्याचा शुक्रवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास बिटको रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.कौटुंबिक वादातून गत दोन वर्षांपासून माहेरी गेलेली पत्नी अनिता, मुलगी संजीवनी, वैष्णवी व मुलगा देवराज यांना गोडीगुलाबीने क्रूरकर्मा पिता संजय बेलदार हा बुधवारी नाशिकला घेऊन आला़ यानंतर गुरुवारी दुपारी पत्नी व मुलांना हॉटेलमध्ये जेवणासही घेऊन गेला़ मात्र, त्यानंतर घरी आल्यावर क्रूरतेचा कळस गाठत सुनीलने मुलगा देवराज (४) व मुलगी वैष्णवी (६) यांचा दोरीने गळा आवळून खून केला़, तर मुलगी संजीवनी (१२) हिला औषधाच्या गोळ्या व इंजेक्शन देऊन मारून टाकण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पत्नी अनिता हिला एकाच ठिकाणी तीन-साडेतीन तास डांबून ठेवल्यासारखे होते़गुरुवारी सायंकाळी चहा करण्याच्या संधीचा फायदा घेत अनिता घराबाहेर पळाली व तिने संबंधित घटना रिक्षाचालकांना सांगून मदत मागितली़ रिक्षाचालक व नागरिक मुलांच्या रक्षणासाठी आले असता स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून सुनीलने पेटवून घेतले़ यामध्ये तो गंभीर भाजला, तर संजीवनीची प्रकृती स्थिर आहे़ बिटको रुग्णालयात उपचार सुरू असलेला गंभीर जखमी सुनीलचा शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास निधन झाले. या प्रकरणी पत्नी अनिताच्या फिर्यादीनुसार मयत सुनील बेलदार विरोधात खून व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. डॉक्टरांनी मयत वैष्णवी, देवराव व सुनील या तिघांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले़ (प्रतिनिधी)
‘त्या’ क्रूरकर्मा पित्याचाही मृत्यू
By admin | Updated: April 15, 2017 01:53 IST