शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडविणाऱ्या  युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:31 IST

जेलरोड चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेला रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्याने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वाघ याचे दोन मित्रदेखील गंभीर जखमी झाले आहेत.

नाशिकरोड : जेलरोड चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेला रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्याने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वाघ याचे दोन मित्रदेखील गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंपानगरी जेलरोड परिसरात रोहित हा आत्येबहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी रविवारी (दि.२८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आला होता.यावेळी संशयित रोहित पारखे, करण केदारे, विशाल जाधव, सोनू गायकवाड, बाळा केदारे, ललित वागळे, मयूर गायकवाड, सागर गांगुर्डे, समाधान आव्हाड, अमित वाघमारे, आशिष वाघमारे यांचे चंपानगरी उद्यानाच्या जवळ आपापसांत भांडण सुरू होते. येथून जवळच रोहितच्या आत्येबहिणीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे रोहित, रितेश, अल्केश हे तिघे त्यांना समजावण्यासाठी गेले. ‘येथे भांडण करू नका, हळदीचा कार्यक्रम आहे’ असे सांगितल्यानंतर संशयितांपैकी रोहित पारखे, करण केदारे यांनी या तिघा मित्रांवर सशस्त्र हल्ला चढविला. कोयत्याने रोहितच्या छातीवर वर्मी घाव लागला तर रितेश, अल्केश यांनाही दुखापत झाली. हल्ल्यानंतर संशयितांनी पळ काढला.गोरेवाडी बनला गुन्हेगारांचा अड्डागेल्यावर्षी मंगलमूर्ती नगरमध्ये नातेवाईकांकडे आलेला कसारा येथील विद्यार्थ्याचा चेहरा एका सराईत गुन्हेगारासारखा साधर्म्यामुळे टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात त्या निष्पाप मुलाला प्राण गमवावे लागले होते. कॅनॉलरोड, मंगलमूर्तीनगर आदी काही जेलरोडमधील भाग सराईत गुन्हेगार, तडीपार गुंड यांचा अड्डा बनुन गेला आहे.सहाजण अटकेतखुनी हल्ल्यातील संशयित बाळा केदारे, ललित वागळे, सागर गांगुर्डे, अमित वाघमारे, विशाल जाधव, समाधान आव्हाड या सहा जणांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन सोमवारी अटक केली आहे. उर्वरित फरारी संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी