शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:51 IST

गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाºयाला नोटीस बजावली असताना दुसरीकडे मात्र बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी दिल्याचा प्रकार रविवारी (दि. २५) घडला.

सटाणा : गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाºयाला नोटीस बजावली असताना दुसरीकडे मात्र बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी दिल्याचा प्रकार रविवारी (दि. २५) घडला.  जिल्हा स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने दर महिन्याला सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात येतात. जानेवारी २०१८ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९ टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत.  या गंभीर प्रकाराकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या नोटिसीत नमूद केले आहे. संबंधित ग्रामपंचायतीने पाणी शुद्धीकरणाबाबत वेळीच लक्ष न दिल्यास याला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र डांगसौंदाणे ग्रामपंचायत आपल्या कारभारावर पांघरून घालण्यासाठी चक्क नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.  रविवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेमधून गावाला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने डांगसौंदाणे येथील पाणी दूषित आल्याचे जाहीर केले. पाणी असताना तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने दवंडी पिटवून दूषित पाणी ही अफवा असल्याचा दावा करत नागरिकांनी पिण्याचे पाणी भरावे, असे आवाहन केले. संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक असा दावा करून जिल्हा प्रशासनालाच खोटे ठरवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे बोबले जात आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत बरखास्त करून संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांविरु द्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी सरपंच कैलास बोरसे यांनी केली आहे.१४० पाणी नमुने दूषित  बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणीदेखील तीन महिन्यांपासून दूषित झाले आहे. जानेवारीत तपासण्यात आलेल्या १५०३ नमुन्यांपैकी १४० नमुने दूषित आल्याने बागलाणचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना नोटीस बाजावण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी