लोकमत न्यूज नेटवर्कझोडगे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील रेशन वाटप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून कोणतेही सामाजिक अंतर ठेवत नसल्याने आणि कुणी तोंडेवर मास्कलावत सनल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.काही किरकोळ लोकांच्या तोंडाला मास्क लावलेले दिसून येतात. त्यामुळे कोरोनाच्या काळातील रेशनचा लाभ घेत असताना कोरोनाचे काही नियम पाळावे लागतात याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. बेपर्वाईमुळे जागरूक नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. रेशन वितरकही अल्पकाळात धान्य वितरण करुन मोकळे होत आहेत. त्यामुळे अपरिहार्यतेतून रेशन मिळवण्यासाठी गर्दी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रेशन वितरणाचे दिवस वाढवून दिल्यास गर्दी कमी होवून कोरोनाचे नियम पाळले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
धान्य वाटप दुकानांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:59 IST