शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड रेल्वेस्थानकावरही परप्रांतीयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:16 IST

राज्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊनच्या भीतीने मुंबई, ठाणे, नाशिक व इतर भागात राहणारे परप्रांतीय पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत. रेल्वे स्थानकात कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय प्रवेश देत नसल्याने परप्रांतीयांची द्विधा मनस्थिती झाली असून, चोर मार्गाने रेल्वेस्थानकात प्रवेश करून परप्रांतीय रेल्वेत बसून निघून जात आहे.     

ठळक मुद्देचोरट्यामार्गाने प्रवेश : विनातिकीट प्रवाश्यांची संख्या वाढली

नाशिकरोड : राज्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊनच्या भीतीने मुंबई, ठाणे, नाशिक व इतर भागात राहणारे परप्रांतीय पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत. रेल्वे स्थानकात कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय प्रवेश देत नसल्याने परप्रांतीयांची द्विधा मनस्थिती झाली असून, चोर मार्गाने रेल्वेस्थानकात प्रवेश करून परप्रांतीय रेल्वेत बसून निघून जात आहे.     रेल्वेचे १२० दिवस अगोदर आरक्षण तिकीट काढता येते. मुंबईहून बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणी जाणाऱ्या जवळपास सर्वच लांब पल्ल्यांच्या रेल्वेचे आरक्षण हाऊसफुल झाले आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने ५ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत पुन्हा लॉक डाऊन जाहीर केला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे व या काळात कोणीही रस्त्यावर विनाकारण न फिरण्यासाठी संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. पुन्हा तशीच भीती काही परप्रांतीयामध्ये निर्माण झाल्याने त्यांनी आपल्या घरी जाण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली आहे. कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय रेल्वे स्थानकात कोणालाच प्रवेश दिला जात नाही. जादा रेल्वे सोडण्याची गरजमुंबई, ठाणे या भागातील परप्रांतीयांची आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी वाढू लागली आहे. अशीच परिस्थिती येत्या काही दिवसात नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून केंद्र शासनाने आत्ताच इतर राज्यात जाणाऱ्या रेल्वेची संख्या वाढवून भीती, घबराट, गोंधळ टाळण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.चोरट्या मार्गाचा अवलंबनाशिकरोड रेल्वे स्थानकाचे सर्व प्रवेशद्वार बंद असले तरी प्लॅटफॉर्म क्रमांक चार, चेहेडी पंपिंग रस्त्याकडील रेल्वे स्थानकात येणारा रस्ता, मालधक्का, तसेच इतर  ठिकाणहून भिंतीवरून उडी मारून स्थानकात प्रवेश करून विनातिकीट निघून जात आहे. रेल्वे स्थानकाशी प्रवेशद्वारावरील कर्मचारी आर्थिक मिलीजुली करून प्रवेश देत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे