शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

उमराणेत कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:16 PM

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कमी झाले असुन बाजारभाव ...

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कमी झाले असुन बाजारभाव अजुन कमी होतील की काय या भितीपोटी तसेच कांद्याची प्रतवारीही घसरु लागल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली आहे. परिणामी कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. मागील वर्षी दसरा व दिवाळीनंतर लाल ( पावसाळी) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परंतु चालुवर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने लाल कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला असुन प्रतिकुल परिस्थितीवर मात करत काही शेतकºयांनी लाल कांद्याची लागवड केली होती. परंतु लागवड केलेल्या कांद्यानाही परतीच्या पावसाने झोडपल्याने काही प्रमाणात येणारा कांदाही खराब झाल्याने बाजारात येऊ शकला नाही. शिवाय नविन कांदा लागवडीसाठी टाकलेले रोपेही खराब झाल्याने लाल कांदा उत्पादन धोक्यात आले असतानाच नविन लागवड झालेल्या लाल रांगडा कांदा बाजारात येण्यासाठी अजुन एक महिना वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.परंतु गेल्या तिन आठवड्यापूर्वी पाच हजारो गाठलेल्या उन्हाळी कांद्याचे दर त्यानंतर दिवसेंदिवस कमी कमी होत २७०० रु पयांपर्यंत येऊन ठेपले असुन गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याची प्रतवारी घसरु लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विक्र ीवर शेतकर्यांनी भर दिला आहे. त्यामुळे बाजारात कांदा आवकेत वाढ झाली आहे. मागणी व पुरवठा याचे व्यस्त प्रमाण झाल्याने व सद्यस्थिती इतर राज्यातून मागणी कमी होऊ लागल्याने कांद्याचे बाजारभाव दररोज कमी कमी होत असल्याचे चित्र आहे.-------------------------चालू आठवड्यात उमराणे बाजार समितीतील कांद्याची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे मंगळवार दि.१५, आवक - ११६१४ क्विंटल, बाजारभाव ३२०० रु पये, बुधवार दि.१६, आवक १५६७३, बाजारभाव ३००० रु पये, @ गुरु वार दि.१७, आवक १७७८५, बाजारभाव २७५२ रु पये, @ शुक्र वार दि.१८, आवक १६५००, बाजारभाव २७०० रु पये

टॅग्स :Nashikनाशिक