शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

ग्रामीण भागात मद्यपींची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:31 IST

येवला : लॉकडाउनच्या अंतिम टप्प्यात तालुक्यातील ग्रामीण भागात देशी मद्य दुकाने व बिअर शॉपी सुरू झाल्याने मद्य खरेदीसाठी तळीरामांची या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.

येवला : लॉकडाउनच्या अंतिम टप्प्यात तालुक्यातील ग्रामीण भागात देशी मद्य दुकाने व बिअर शॉपी सुरू झाल्याने मद्य खरेदीसाठी तळीरामांची या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने संपूर्ण येवला शहरच कंटेन्मेंट झोन झाले असल्याने शहरातील मद्याची दुकाने बंदच आहेत; मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील अंदरसूल, नगरसूल व राजापूर येथील देशी मद्याची दुकाने, बिअर शॉपी मात्र सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातील या मद्य दुकानांवर तळीरामांच्या मद्य खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागत असून, मोठी गर्दीही दिसून येत आहे. शहरातील अनेक मद्यशौकीन ग्रामीण भागातील या मद्य दुकानांवरील रांगांमध्ये दिसून येत आहेत. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळून शिस्तीत मद्य विक्री सुरू आहे. मद्यविक्र ी दुकानांवर प्रत्येक ठिकाणी एक कर्मचारी मद्यखरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचे तापमान घेत आहे. मद्य खरेदीसाठी टोकन दिले जात असून, ग्राहकाला मास्क वापरणे आवश्यक आहे.मद्यदुकानातील कर्मचारीही हातमोजे, सॅनिटायझरचा वापर करत असून, ग्राहकांनाही सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जात आहे. मद्यदुकानांचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण केला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एस. वाय. श्रीवास्तव, उपनिरीक्षक पी. डी. कुडवे आणि सहकारी मद्यविक्र ीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक