शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सुट्यांमुळे पंचवटीत पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:29 IST

नाताळ सणाच्या सुट्ट्या तसेच वीकेंडमुळे अनेक शासकीय, निमशासकीय तसेच खासगी नोकरदार वर्षअखेर आनंदात जावे यासाठी सुट्ट्या टाकून देवदर्शनासाठी बाहेर पडले असून, पंचवटीत गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे.

पंचवटी : नाताळ सणाच्या सुट्ट्या तसेच वीकेंडमुळे अनेक शासकीय, निमशासकीय तसेच खासगी नोकरदार वर्षअखेर आनंदात जावे यासाठी सुट्ट्या टाकून देवदर्शनासाठी बाहेर पडले असून, पंचवटीत गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. थंडी कमी झाल्यामुळे शेकडोच्या संख्येने परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील भाविक देवदर्शनासाठी दाखल झाल्याने देव-देवतांचीमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.वर्ष समाप्तीला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने त्यातच नाताळ सणाच्या सुट्ट्या पर्यटक तसेच भाविकांसाठी पर्वणी ठरली आहे. काही दिवसांपासून पसरलेल्या कडाक्याच्या थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने भाविक नाशिकला पसंती देत आहेत.गोदाघाटासह संगमावर भाविकांची गर्दीपंचवटी परिसरात दैनंदिन शेकडो भाविक देवदर्शनासाठी दाखल होत असल्याने श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्वर, रामकुंड परिसर तपोवन, गंगाघाट भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पंचवटी परिसरात वाहनांचीदेखील गर्दी आहे. भाविकांच्या गर्दीमुळे परिसरातील विविध व्यावसायिकांचे व्यवसाय तेजीत आले आहेत. पंचवटीतील रस्ते सकाळच्या सुमारास भाविकांच्या पदयात्रेने फुलून जात असल्याचे दिसून येते. देवदर्शनासाठी येणारे भाविक भाजीबाजार पटांगण, महापालिका वाहनतळ तसेच राममंदिर बाहेर असलेल्या रस्त्यावर चारचाकी वाहने उभी करत असल्याने परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पर्यटक व भाविकांची गर्दी पाहता परिसरातील हॉटेल, लॉजेसदेखील फुल्ल झाले आहेत. याशिवाय गाइड, रिक्षाचालक, हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिकgodavariगोदावरी