शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मद्यालयांसमोरील तळीरामांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:58 IST

सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.

सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे.कोरोनाच्या संकटात दारू दुकाने उघडण्यास शासनाने बंदी घातली होती. दारूच्या आहारी गेलेल्यांना कधी एकदा दारु मिळेल असे झाले होते. त्याबाबत समाज माध्यमांतून चर्चाही सुरू झाली होती. सर्वच बाजंूनी ही चर्चा सुरू झाल्यांनतर मोठा महसूल बुडत असल्याचा साक्षात्कार शासनाला झाला आणि दारू दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. पहिल्या दिवशी तळीरामांनी तुडुंब गर्दी केल्याने पोलीसाना हस्तक्षेप करीत ही दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, त्यानंतर शासनाने काही बंधने लादत पुन्हा दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. दुकानासमोर बॅरिकेट्स लावणे, ग्राहकांना सावलीत उभे राहता यावे यासाठी मांडव टाकणे, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, सॅनिटायझरने हात धूणे यासह सर्व बाबींची दुकानदारांनी व्यवस्था केली. त्यानंतरही दुकानात एकदम गर्दी होऊ नये म्हणून दुकानाबाहेर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उभे केले. टोकन नंबर देऊन एका-एका ग्राहकाला माल देण्याची व्यवस्था करण्यात आली.रस्त्यावर होणारी ग्राहकांची गर्दी हुसकावण्यासाठी पोलीसांची नियुक्ती करण्यात आली. दुकानाबाहेर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी थांबले याचा अर्थ दुकाने २-३ दिवसच उघडतील असा कयास बांधून अनेकांनी महिना-दोन महिना पुरेल एवढी दारू खरेदी केली. अनेकांनी दारूच्या खंब्यांचे बॉक्सच्या बॉक्स उचलून नेले. मात्र, त्यानंतर प्रत्येक ग्राहकाला दोनच खंबे देणे सुरू झाले. विक्रेता दिवसभरात जास्तीत जास्त ४०० ग्राहकांनाच मद्य विकू शकेल, असे बंधन घातले गेले. दुकानांची वेळ १० ते ५ असताना साडेतीनलाच अपेक्षित ग्राहक झाल्याने दुकान बंद करण्याची वेळ विक्रेत्यांवर येत होती. मात्र, ३-४ दिवसांनतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.-------------------------------------------------------शहरातील तीनही दुकानांसमोर दिसणारी ग्राहकांची रांग बंद झाली आहे. त्यामुळे दुकानासमारील मंडप गायब झाले आहेत. दुकानासमोरील गर्दी आवरण्यासाठी विक्रेत्यांना जादा माणसे कामावर ठेवावी लागली होती. त्यांचे कामही कमी झाले आहे. सकाळी १० वाजेला दुकान उघडल्यापासून दिवसभरात शंभर ग्राहकही येत नसल्याने विक्रेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. जादा विक्री होईल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेला माल दुकानात पडून आहे. तथापि तळीरामांनी घरातच साठा करून ठेवल्याने त्यांना म्हणावा असा उठाव नसल्याने चांगल्या ‘कमाई’चे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक