शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, खासगी वाहतुकदारांकडून दुप्पट भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 15:20 IST

मनमाड: कसारा रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हरहेड वायर दुरु स्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडी ने धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे.

मनमाड: कसारा रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हरहेड वायर दुरु स्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडी ने धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. यामुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याने मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटणाºया मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस व मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने दैनंदिन कामकाजासाठी जा ये करणाºया चाकर मान्यांची गैरसोय झाली. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे तर काही गाड्या मनमाड व नाशिक रेल्वे स्थानकावरून माघारी फिरवण्यात आल्या. ऐन गणेशोत्सव काळात प्रवाशांची गौरसोय झाली आहे.अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे.उत्तर भारतात जाणा-या अनेक गाड्या मनमाड स्थानका वरून परत पाठवण्यात आल्याने स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. मनमाड येथून नाशिक व मुंबईकडे जाण्यासाठी काही प्रवाशांनी खाजगी वाहनाने जाण्याचा पर्याय निवडला.प्रवाशाची गर्दी अधिक वाढल्याने जादा दराने भाडे देण्याची वेळ प्रवाशांवर आली. रेल्वे स्थानकावर वाढलेल्या गर्दीमुळे रेल्वे स्थानक व परिसरात खाद्य पदार्थ व पाण्याच्या दरात काही विक्र ेत्यांनी अव्वाच्या सव्वा वाढ केल्याच्या तक्र ारी प्रवाशांनी केल्या.गाड्यांचे बदलेले नियोजन...रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गाड्यांचे नियोजन बदलण्यात आले आहे. यामध्ये मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकावरून परत येणार आहे. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस कल्याण वरून पुणे दौंड मार्गे मनमाड कडे वळवण्यात आली आहे. मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस निर्धारित वेळेत नाशिक स्थानकावरून सुटणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड येथून निर्धारित वेळेत सुटणार आहे.गोदान एक्सप्रेस कल्याण पुणे दौंड मनमाड मार्गे रवाना होणार आहे. गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस निर्धारित वेळे ऐवजी १ वाजता सुटेल.पवन एक्सप्रेस निर्धारित वेळेऐवजी २ वाजता सुटेल. कामायनी एक्सप्रेस निर्धारित वेळे ऐवजी २.३० ला सुटेल.मुंबई भुसावळ पॅसेंजर आज रद्द करण्यात आली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.गोदावरी एक्सप्रेस रद्द ....बाप्पांची आरती मात्र अखंडित...मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस आज रेल्वे प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी गोदावरी एक्सप्रेस मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणरायाची आरती मात्र अखंडित पणे निर्विघ्न पार पडली. सकाळी फलाटावर लावलेल्या गोदावरी एक्सप्रेसमध्ये भाविक प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक के. डी. मोरे यांच्या हस्ते गणरायाची आरती केली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैरे, मुकेश निकाळे, संदीप व्यवहारे, धनंजय आव्हाड, संदीप आढाव , मंगेश जगताप, स्वप्नील म्हस्के , सुरज चैधारी,विशाल अहिरे भूषण पवार आदी उपस्थित होते. सायंकाळची आरती पण मनमाड रेल्वे स्थानकावर करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक