शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांची गर्दी

By admin | Updated: November 15, 2016 02:48 IST

कार्तिक महोत्सव : दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

पंचवटी : पंचवटीतील एकमेव मंदिर असलेल्या श्री कार्तिक स्वामी मंदिरात श्री काशी नट्टकोटाईनगर छत्रंम मॅनेजिंग सोसायटी यांच्या वतीने रविवारपासून कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिक महोत्सवनिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.रविवारी रात्री ११.१८ वाजेला कार्तिक पौर्णिमा सुरू झाल्याने व सोमवारी सायंकाळी ७.२२ पर्यंत पौर्णिमा तसेच दुपारी ४.२७ पासून मंगळवारी दुपारी १.१७ पर्यंत कार्तिक नक्षत्र असल्याने भाविकांना मंगळवारपर्यंत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. कार्तिक महोत्सवानिमित्ताने भाविकांनी सोमवारी सकाळपासून कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रविवारी रात्री मंदिरात पूजाविधीने कार्यक्र माला सुरुवात करण्यात आली. देवाला स्नान, अभिषेक पूजन करून साजशृंगार करत नारळपाणी, दूध, दही, तीळ, पंचामृत आदिंसह विविध फळांच्या रसांचा अभिषेक करण्यात आला. तीन तास अभिषेक पूजन केल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले.कार्तिक स्वामींचे वाहन मोर पक्षी असल्याने या दिवशी देवाला मोरपीस व नारळ चढविण्याची प्रथा असल्याने भाविक विशेषत: महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली होती. (वार्ताहर)