नाशिक : नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने पोलिसांनी बंदोबस्त आणि गर्दी व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून संपूर्ण शहरालाच बल्ली बॅरिकेडिंग लावून बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. बाहेरील नागरिकांनी शहरात यावे; परंतु पायीच आणि स्थानिक नागरिकांनी शहरात मुक्तपणे वावरू नये, अशी ही तजवीज जणू करण्यात आली होती. कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीला भाविकांची अपेक्षित संख्या न जमल्याने त्यावर टीकेची झोड उठली. आठ कोटी रुपयांचे बांबू (बल्ली बॅरिकेडिंग) कोणासाठी लावले याबाबत राजकीय टीकाटिप्पणी आणि पोलीस आयुक्तांना भारत-पाक सीमेवर बॅरिकेडिंग करण्यासाठी केंद्र शासनाच्या सेवेत पाठविण्याचे शेलापागोटे सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर दुसर्या पर्वणीत काही प्रमाणात हे बांबू हटविण्यात आले. अर्थात, त्यावर काही भागातील बांबू कमी झाले इतकेच. मात्र, त्यानंतर या बल्ली बॅरिकेड्ससाठी खोदलेले खड्डे कायम राहिले. महापालिकेने कुंभमेळ्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचे रस्ते तयार केले; परंतु पोलीस विभागाने सर्व रस्त्यांची यानिमित्ताने खड्डे खोदून चाळणी केली. याबद्दल पालिकेने या यंत्रणांकडे वीस लाख रुपयांची मागणी केली आहे.
कोटींचे खड्डे अन् २0 लाखांचे बिल
By admin | Updated: October 6, 2015 23:04 IST