शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

जिल्ह्यात पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:27 IST

पाटणे : परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डाळिंबबागांसह अन्य पिकांना झळ बसली आहे. मागील वर्षी डाळिंंबाचे अपेक्षित उत्पादन हाती लागले नाही. कारण मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बहार धरला. जून महिन्याच्या सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फूलगळ होऊन फळधारणा अतिशय अल्प प्रमाणात झाली.

पाटणे : परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डाळिंबबागांसह अन्य पिकांना झळ बसली आहे. मागील वर्षी डाळिंंबाचे अपेक्षित उत्पादन हाती लागले नाही. कारण मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बहार धरला. जून महिन्याच्या सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फूलगळ होऊन फळधारणा अतिशय अल्प प्रमाणात झाली. परिणामी डाळिंंबबागा यशस्वी झाल्या नाहीत. त्याचा फटका डाळिंंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. यावर्षीही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पुन्हा बागांची सेटिंग होताना शेतकºयांना मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागली. हजारो रुपये फवारणी, खतांसाठी खर्च करून जिवापाड जोपासलेल्या बागेत फळधारणा होऊन डाळिंंबबागा बहरत असतानाच गेल्या तीन दिवसांच्या पावसामुळे बागेमध्ये दोन दोनफुटापर्यंत पाणी साचले आहे. पाण्याचा निचराही होत नसल्याने मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.फळगळ व फूलगळ तसेच डाळिंंबाच्या झाडांचे नुकसान होत आहे. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यत डाळिंंब उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. डाळिंंब उत्पादक शेतकºयांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी पाटणे येथील डाळिंंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत अहिरे, विजय हिरे, सोसायटीचे माजी चेअरमन हरिदास अहिरे, माजी सरपंच नथू खैरनार, दादाजी खैरनार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास आहिरे, सुरेश रघुनाथ अहिरे, नानाजी शेवाळे, सुभाष अहिरे, नारायण खैरनार, कृष्णा आहिरे, दशरथ खैरनार, शिवाजी खैरनार, शरद खैरनार, शंकर खैरनार, दशरथ खैरनार, ईश्वर खैरनार, लालचंद खैरनार आदी शेतकºयांनी केली आहे.----------------डोंगरगावी नुकसानमेशी : देवळा पूर्व भागातील डोंगरगाव, मेशीसह परिसराला पावसाने तीन दिवसांपासून झोडपून काढले असून, खरीप पिकांसह कोबी, टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डोंगरगाव येथील गोकुळ सावंत, चिंतामण सावंत यांच्यासह अनेक शेतकºयांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याने बाजरी, मका आणि भुईमूग आदी पिके खराब झाली आहेत. याशिवाय मेशी येथील भिका शिरसाठ यांच्या टमाटा व कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सलग दोन-तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा चाळीत पाणी घुसल्याने कांदा सडण्याची भीती आहे. महसूल विभागाने दखल घेऊन पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. ओढे, नाल्यांचेही पाणी उभ्या पिकांमध्ये घुसल्याने पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पिके सडण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.--------------पाटोदा परिसरातील गावांमध्ये हजारो एकर मका, बाजरी भुईसपाटपाटोदा : परिसरात शनिवारी, (दि. २५) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाने परिसरातील पाच ते सहा गावांमधील हजारो हेक्टर मका व बाजरीचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.हातातोंडाशी येत असलेला घास अस्मानी संकटाने हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी व सोयाबीन पिकावरील उंट अळीने शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. अळी नियंत्रणासाठी हजारो रु पयांची महागडी औषधे व कीटकनाशके फवारणी करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांवर वादळी पावसाचे दुहेरी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.शनिवारी सायंकाळी वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसाने पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, आडगाव रेपाळ, विखरणी, पिंपरी, दहेगाव, सातारे, शिरसगाव, लौकी, निळखेडे, सोमठाणदेश, गुजरखेडे या भागातील मुख्य पीक असलेले मका, व बाजरीचे पीक आडवे होऊन पूर्णत: भुईसपाट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक