शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पिक नुकसानीचा आधार

By श्याम बागुल | Updated: October 20, 2018 15:47 IST

राज्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने सुमारे २०० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा आढावा सरकार पातळीवर घेतला जात आहे. खुद्द मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात भेट देवून पाणी टंचाईचा आढावा घेत आहेत

ठळक मुद्देदोन दिवसात प्रस्ताव द्या : चारा, पाणी, रोजगाराचा आधार

नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची समिती पाहणी करून त्यावर निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी, राज्यातील दोनशे तालुक्यांमध्ये चारा, पाणी, रोजगाराच्या प्रश्नावरून सरकारच्या विरोधात निर्माण होत असलेला असंतोष पाहता केंद्रीय समितीची वाट न पहाता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दुष्काळ घोषीत करण्याच्या निकषात बसणाऱ्या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ५० टक्क्यापेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या गावांचे प्रस्ताव येत्या दोन दिवसात पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.राज्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने सुमारे २०० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा आढावा सरकार पातळीवर घेतला जात आहे. खुद्द मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात भेट देवून पाणी टंचाईचा आढावा घेत आहेत तर त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील दुष्काळ सदृष्य परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याबाबत संपुर्ण देशात एकच प्रणालीचा वापर करण्याचे ठरविले असल्याने त्यासाठी नियम, निकषही ठरवून देण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक महिन्याला पडणारे पर्जन्यमान, पिकाची परिस्थिती, जमिनीची आर्द्रता या गोष्टींचा समावेश आहे. परंतु यंदा आॅक्टोंबरमध्येच दुष्काळाच्या झळा बसू लागल्याने सरकारने निव्वळ पर्जन्यमानाचा निकष गृहीत धरून त्या आधारे दुष्काळ जाहीर करणाºया प्रणालीतील ट्रीगर दोनचा वापर करण्याचे ठरविले. त्यानुसार दुष्काळाच्या छायेत असलेल्या तालुक्यांमधील दहा टक्के गावांमध्ये पीक परिस्थितीची पाहणी करून त्याचे मुल्यांकन (पीकाचे नुकसान व मिळणारे उत्पन्न) पुर्ण केले आहे. त्याचा अहवाल शासनाला आॅनलाईन सादर करण्यात आला आहे. आता शासनाने त्यात नव्याने भर टाकली असून, पिकांचे अंदाजे ३० टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले असल्यास संंबंधित तालुक्यात दुष्काळ नाही म्हणजे परिस्थिती सामान्य आहे असे समजावे असे म्हटल आहे. पिकाचे ३० ते ५० टक्क्याच्या दरम्यान नुकसान झाले असल्यास तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ तर ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ समजण्यात यावे असे म्हटले आहे. दुष्काळग्रस्त तालुक्याच्या मुल्यांकनात पिण्याचे पाणी, चाºयाची उपलब्धता तसेच रोजगाराची मागणी देखील विचारात घेण्यात यावी व तसा प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक