शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजांवर विविध बँकांची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 18:35 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरी बँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्दे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला जमीन लिलावाची धमकी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरीबँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस त्यांत शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नसल्यांमुळे बळीराज्य अनेक संकटानां तोंड देत असताना बँक प्रशासानाकडून शेतक-यांच्या जमिनीचे लिलाव जर होणार असतील तर शासनाने आधी शेतक-यांच्या पिकांचे कृषीविषय धोरण जाहिर करावे. आज शेतक-यांची जी अवस्था झाली आहे. ती फक्त त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांत अनेक नैसगिक आपत्तीचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे.तालुक्यात अनेक शेतक-यांनी बँका कडून कर्ज काढून फळबागासह पॉलिहाऊसमध्ये भाजीपाल्यासह फळाची लागवड केली मात्र अनेक वेळा उपन्नापेक्षा खर्चच जास्त झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे व फळबागासह भाजीपाला पिका योग्य भाव न मिळांल्यामुळे दिवसोदिवस जगाचा पोशिंदा कर्जबाजारी होत आहे.विशेष म्हणजे या पिकांत पैसे नाही झाले तर पुढील पिकांत पैसे होतील या आशेवर शेतकरी भांडवल उभे करून पिकांची लागवड व पेरणी करत असतो मात्र वांरवार पिकापासून नैसर्गिक आपत्ती किंवा बाजार भाव न मिळाल्यांमुळे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या एका नव्या वळाणावर येवून उभा आहे त्यांमुळे त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहिर आशी झाली आहे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी सर्वात जास्त कर्जबाजारी झाले ते द्राक्ष शेतीमध्ये कारण सध्या द्राक्षशेती अतिशय धोक्याच्या वळणावर येवून उभी आहे. द्राक्षपिकांला मोठ्या प्रमाणावर भांडवल लागत असते व भांडवल खर्च करूनही योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.प्रतिक्रियाराज्यात गेल्या दहा वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफी दोन लाखापर्यंत दिली तरी या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना पुरेपूर मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत असून बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे.- रोहिणी गावित, जि प सदस्य अहिवंतवाडी गट.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक