त्र्यंबकेश्वर : बारा वर्षांनंतर भरलेल्या कुंभमेळ्यातील अखेरची पर्वणी त्यातच लागून आलेल्या शासकीय सुट्ट्या यामुळे शुक्रवारी येथे भाविकांनी लाखांच्या संख्येने हजेरी लावली. सायंकाळपर्यंत सहा लाख भाविकांनी हजेरी लावून स्नान केल्याचा पोलिसांना अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत भाविकांचा राबता सुरूच होता. त्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.बारा वर्षांनंतर भरणाऱ्या कुंभमेळ्यातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सर्व पर्वण्या संपल्या. नाशिकमध्ये १८ सप्टेंबर रोजी अखेरची पर्वणी संपली त्यापाठोपाठ त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी अखेरच्या पर्वणीची सांगता झाली. अखेरची पर्वणी असल्याने त्र्यंबकेश्वर येथे गर्दी होईल असा अंदाज होताच, परंतु शुक्रवारी बकरी ईद, शनिवारी चौथा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाली. पर्वणीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारपासूनच त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती. या एका दिवसातच एक लाख भाविकांनी स्नान केल्याचे सांगण्यात येत होते, सायंकाळनंतर गर्दी अधिकच वाढली. रात्री मेनरोड, तेली गल्लीसह सर्वच भागांत भाविकांची गर्दी झाली होती. शाही मिरवणूक बघण्यासाठी भाविकांचे जत्थेच्या जत्थे दाखल होत होते. (वार्ताहर)
उदंड प्रतिसाद
By admin | Updated: September 25, 2015 22:48 IST