शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

पक्षीय प्राबल्य ठरणार निर्णायक

By admin | Updated: February 16, 2017 01:33 IST

पक्षीय प्राबल्य ठरणार निर्णायक

मनोज मालपाणी नाशिकरोडयेथील प्रभाग २० मध्ये शिवसेना, भाजपा या दोन पक्षांमध्येच सध्यातरी लढत होण्याची चिन्हे आहेत. तर दोन ठिकाणी मनसेचे उमेदवारदेखील चमत्कार घडविण्याच्या तयारीत आहेत. काही अपक्षांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना मिळणाऱ्या मतांचे गणित समीकरण बदलणारे ठरू शकते. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी निवडणुकीतून बाहेर पडली आहे.नाशिक-पुणे महामार्गाच्या उपनगर नाका ते बिटको पॉइंटपर्यंत दुतर्फा नवीन प्रभाग २० ची व्याप्ती आहे. उमेदवारी निश्चित करताना शिवसेनेला जास्त रोष सहन करावा लागला नाही. मात्र भाजपाला अनुसूचित जाती गटातील उमेदवारी निश्चित करताना जुने-नवीन असा वाद निर्माण झाल्याने अखेरीस जुन्या गटाला झुकते माप द्यावे लागले. तर मनसेला ब व क गटात उमेदवारच न मिळाल्याने त्यांचे पॅनल पूर्ण होऊ शकले नाही. कॉँग्रेसला सोडलेल्या दोन जागांवर त्यांनी वेळीच उमेदवार दिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या दोन्ही उमेदवारांची माघार घेऊन या प्रभागातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.‘अ’ अनुसूचित गटातून शिवसेना- अशोक पगारे, भाजपा- अंबादास पगारे, भाजपाने उमेदवारी नाकारल्याने मनसेकडून विकास पगारे, राष्ट्रवादीचा उशिरा एबी फॉर्म जमा केल्याने अपक्ष ठरलेले माजी नगरसेवक संजय अढांगळे, कॉँग्रेसचा एबी उशिरा दाखल करणारे अपक्ष अनिल बहोत, भारिप बहुजन महासंघाचे अरुण शेजवळ, शिवसेना बंडखोर रवीकिरण घोलप, अपक्ष प्रदीप बागुल, उदय भालेराव, संजय पगारे, तुषार दोंदे, नितीन पंडित हे १२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र या ठिकाणी पक्षीय ताकद महत्त्वाची भूमिका बजावेल असे सध्याचे चित्र आहे. ब इतर मागासवर्ग महिला गटातून शिवसेनेकडून सुनीता श्रीराम गायकवाड व भाजपाकडून माजी नगरसेविका सीमा राजेंद्र ताजणे यांच्यात आमनेसामने लढत होणार आहे. जवळचे संबंध व मित्र कंपनीचा गोतावळा यामुळे दिवसेंदिवस या लढतीतील चुरस वाढू लागली आहे. क सर्वसाधारण महिला गटातून भाजपाकडून नगरसेविका संगीता हेमंत गायकवाड व शिवसेनेकडून योगिता किरण गायकवाड यांच्यात लढत होत आहे. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केलेली कामे हे त्यांचे भांडवल असून मळे विभागांतील संबंध ही योगिता गायकवाड यांच्या जमेची बाजू आहे.‘ड’ गटातून भाजपाकडून नगरसेवक संभाजी मोरूस्कर, शिवसेनेकडून गिरीश मुदलियार, मनसेकडून विक्रम कदम, अपक्ष नितीन गुणवंत रिंगणात आहेत. मोरूस्कर गेल्या दहा वर्षापासून नगरसेवक असून, प्रभागातील कामांच्या जोरावर आणि भयमुक्त प्रभाग या मुद्द्यांवर ते मते मागणार आहेत. तर शिवसेनेचे गिरीश मुदलियार बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारांसमोर आले आहेत. सामाजिक उपक्रमाच्या जोरावर त्यांची मदार आहे. मनसेचे विक्रम कदम यांनी गेली निवडणूक लढविली होती. दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांनी चांगली मोर्चेबांधणी केली आहे.