शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो पिकांवर अस्मानी संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 14:54 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल: धुक्याचे प्रमाण वाढले :पिकांवर विपरीत परिणाम

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे.शेतकरी वर्गाने टमाटा पिकाला पसंती दिली. थोड्या फार भांडवलाच्या आधारे टमाटा साहित्य खरेदी करून हे पिक घेण्यासाठी नियोजन केले. त्यासाठी लोखंडी तार, बांबू, लोखंडी खिळे इ. साहित्याची खरेदी करून टमाटा पिक घेण्यासाठी मोर्चा बांधणी केली. परंतु टमाटा लागवडी पासून ते बांबू उभे करण्यापर्यंत शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागली आहे.सकाळचे वातावरण हे अतिशय दाट धुक्याचे तर दुपारी कडक ऊन व संध्याकाळी पावसाचे वातावरण अन् रात्री थंडी. त्यामुळे पिकांवर धुक्याचे पाणी साचते, परिणामी फुलकळी गळून पडणे, तसेच टमाटा फळ फुगवणीवर परिणाम होताना दिसत आहे. फुलकळी व फळांची निगा राखण्यासाठी शेतकरी वर्गाला दररोज महागडी औषधे, खते तसेच वेगवेगळ्या स्वरूपाची फवारणी करावी लागत आहे.चौकट...१) वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याचे शक्यता.२)शेतकरी टमाटा पिकं वाचिवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करून पिके वाचिवण्यासाठी भर देतो आहे.३) दाट धुक्याचा फुलकळी व फळधारणेवर परिणाम होण्याची शक्यता.४) अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग हतबल.५) मागील वर्षी पेक्षा यंदा भांडवल जास्त खर्च झाल्याने बळीराजा हतबल.प्रतिक्रि या..यंदा टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ होत आहे. कोरोनामुळे अगोदर नर्सरी मध्ये टोमॅटो रोपे मिळत नव्हती. परंतु मोठ्या कष्टाने रोपे उपलब्ध करून या पिकांला पसंती दिली. परंतु वातावरणातील बदलावाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च झालेला आहे. त्यामुळे आम्हाला टमाटा पिकं घेतांना मोठी धावपळ करावी लागत आहे.- समाधान देशमुख, शेतकरी, कोशिंबे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी