शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भात पिकांवर करपा रोगाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 17:00 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अस्वली, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, देवळे, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, टाकेद, अडसरे, घोडेवाडी, बांबळेवाडी, खेड आदीं परिसरातील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने येथील भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

ठळक मुद्देइगतपुरीच्या पूर्व भागात पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अस्वली, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, देवळे, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, टाकेद, अडसरे, घोडेवाडी, बांबळेवाडी, खेड आदीं परिसरातील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने येथील भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.यावर्षी सुरु वातीला पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची भात रोपे खराब होऊन वाया गेली असून नंतर पाऊस सुरू झाला परंतू अचानक कमी कालावधीत प्रचंड पाऊस झाल्याने अतिशय कमी वेळेत शेतकºयांनी भात लागवड केली. यावेळीही जास्त पाण्यामुळे भात शेतीची नुकसान झाली आणि आता शेतकºयांनी इंद्रायणी, १००८, पूनम, सोनम, ओम श्री राम, गरे, हाळे, आर चोवीस, रु पाली अशा विविध भाताच्या वाणांची लागवड केली आहे.मात्र काही दिवसांपासून लागवड केलेली भात पिके पिवळे पडू लागली असून त्यावर सुकवा गेल्याचे जाणवत असल्याने त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. अगोदरच येथील भात उत्पादक शेतकरी या वर्षी अनेक अडचणीत असताना आता करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे.याकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देवून रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्या व शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.पावसाला उघडीप मिळाल्याने भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. करपा नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून ग्राम स्तरावर उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.- शितलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी.भात पिकांचे पोषण होण्याचा हा कालावधी होता मात्र भात पिकावर करपा रोग जात असून पिके पिवळी पडून सूकवा जात आहे. आधीच या वर्षी भात पिके संकटात असताना आता करपा रोगामुळे नुकसान होत असल्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करावे. यामुळे तालुक्यातील शेतक-यांना दिलासा मिळेल.- राजू रोकडे, शेतकरी, नांदूरवैद्य.(फोटो १३ नासूरवैद्य, १)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी