सिन्नर : एकामागोमाग येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असली तरी लष्करी अळीचे मोठे संकट यंदा देखील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.सिन्नरच्या पूर्व भागात पारंपरिक पिकांसोबतच मका आणि सोयाबीन यासारख्या नगदी पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे. यंदाच्या हंगामात वरुण राजाची कृपादृष्टी राहील असे संकेत मिळत आहेत . कारण एरवी जुलै अखेरीस वाट बघायला लावणारा मान्सून वेळेआधीच पुर्वभागात बरसला. त्यामुळे जूनच्या दुसºया आठवड्यात बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या होत्या . मका आणि सोयाबीनचे क्षेत्र पूर्व भागात तुलनेने अधिक आहे. यंदा सोयाबीन शेतकºयांना ठेंगा दाखवणार अशी परिस्थिती आहे. कारण उगवणक्षमता घटल्याने अनेक ठिकाणी पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. हे होत असतानाच उगवून मका पिकावरील लष्करी अळी चे अस्तित्व दिसू लागल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लष्करी अळीच्या आक्रमणामुळे दोन वर्षांपूर्वी मका पीक भुईसपाट झाल्याचे विदारक चित्र शेतकºयांनी अनुभवले आहे. जनावर देखील मक्याच्या चाºयाला तोंड लावत नव्हते. त्यामुळे यंदा देखील या संकटाचा सामना करावा लागणार असे शेतकरी बोलून दाखवत आहे.--------------------मक्यावरील आळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आता रासायनिक औषधांची मात्रा वापरली जात आहे. खतांसोबतच महागड्या औषधांचा डोस मका पिकाला द्यावा लागणार असून त्यातून आर्थिक घडी विस्कटलेला शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे.शासनस्तरावरून लष्करी आळी नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच आवश्यक औषधांचा पुरवठा करावा अशी मागणी आता शेतकरी करत आहे. आधीच लॉक डाऊन मुळे शेतकºयांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. शेती पिकांना भाव नाही. अशा परिस्थितीत खरीप हंगामात खते आणि औषधांचा खर्च करायचा कसा असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
मक्यावर लष्करी आळीचे संकट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:26 IST