शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:50 IST

घोटी : जमावबंदीचे उल्लंघन घोटी : घोटी बाजार समितीने घेतलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या स्थलांतराच्या निर्णयाच्या विरोधात शनिवारी करण्यात आलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कोणतीही पूर्वसूचना न देता जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देभाजीपाला विक्री केंद्राचे स्थलांतर केल्याने शनिवारी तालुक्यातील शेतकरी संतप्त अंतिम तोडगा निघणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

घोटी : जमावबंदीचे उल्लंघन घोटी : घोटी बाजार समितीने घेतलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या स्थलांतराच्या निर्णयाच्या विरोधात शनिवारी करण्यात आलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कोणतीही पूर्वसूचना न देता जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.घोटी बाजार समितीने शेतकºयांना विश्वासात न घेता भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत भाजीपाला विक्री केंद्राचे स्थलांतर केल्याने शनिवारी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला होता. या शेतकºयांनी संघटित होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावर आपला शेतमाल फेकून देत, रस्त्यावर ठिय्या मांडीत तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करीत महामार्ग रोखून धरला होता. यामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले होते. या बाबीची गंभीर दखल पोलीस यंत्रणेने घेतली असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पांडुरंग शिंदे यांच्यासह भास्कर गुंजाळ, बाळासाहेब धुमाळ आदींसह शेकडो अज्ञात शेतकºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बैठकीकडे लक्षघोटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजार समिती आवारात भाजीपालाविक्र ीसाठी येणाºया शेतकºयांच्या वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने शेतमालाचा काही माल शहराच्या बाहेर विक्र ी करण्याच्या उद्देशाने बाजार समितीने शहराबाहेर जागा भाडेतत्त्वावर घेत या जागेत भाजीपाला केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.या ठिकाणी सुविधा नसल्याने शेतकरी आक्र मक होत त्यांनी आंदोलन केले होते. याबाबत शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती पदाधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत अंतिम तोडगा निघणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.