शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर स्वयंपाक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:06 IST

रस्ता कामांची बोगस बिले व दर्जाहीन कामांची तपासणी सुरू असताना आता लग्नकार्यातील जेवणावळीसाठी महापालिकेने बनविलेल्या रस्त्यावर डेग ठेवून स्वयंपाक करणाºया नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच डेग जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालेगाव : रस्ता कामांची बोगस बिले व दर्जाहीन कामांची तपासणी सुरू असताना आता लग्नकार्यातील जेवणावळीसाठी महापालिकेने बनविलेल्या रस्त्यावर डेग ठेवून स्वयंपाक करणाºया नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच डेग जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, महापौर रशीद शेख व मनपा आयुक्त धायगुडे व समितीच्या पदाधिकाºयांनी बुधवारी शहरातील वॉर्ड क्र. २० मधील संशयास्पद कामांची पाहणी केली.  शहरात १४ बोगस कामे करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. कामे न करताच बिले काढण्याचा घाट ठेकेदारांनी रचला होता. या कामांच्या तपासणीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. बुधवारी महापौर शेख, मनपा आयुक्त धायगुडे, अधिकारी व समितीच्या सदस्यांनी महापौरांचा वॉर्ड असलेल्या वॉर्ड क्र. २० मध्ये कामांची पाहणी केली. सदर वॉर्डातील रस्ते उखडली आहेत. रस्त्यांची दुरूस्ती केल्याशिवाय बिल अदा केले जाणार नाही. दरम्यान, लग्नाच्या जेवणावळीसाठी रस्त्यावरच स्वयंपाक केला जात असल्याने रस्त्यांची दुर्दशा होत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच डेग जप्तीची कारवाई केली जाणार आहे. बोगस बिले व कामांच्या तपासणीमुळे विकास कामे थांबणार नाहीत; मात्र चुकीची कामे थांबतील. अभियंत्यांचा अभिप्राय घेवून कामे करणे गरजेचे आहे. रस्त्यांचा दर्जा व ठेकेदाराने निर्धारित वेळेत कामे केली तर त्यांचे डिपॉझिट व बिले अदा केले जातील; विकास कामांना मुदतवाढ दिली जाणार नाही. सुमारे १० कोटीची रद्द केलेली २७२ कामांपैकी काही कामे करणे गरजेचे असेल तर उपायुक्त व मनपा अधिकाºयांकडून पाहणी करुन अहवाल मागविला जाईल. या कामांबाबत सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. गुरूवारपासून रोखलेल्या बिलांच्या तपासणीचे काम केले जाणार आहे.  अमृत योजनेंतर्गत जलवाहिनीच्या कामामुळे उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदाराकडून करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मनपा आयुक्त धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गुन्हे दाखल करणारच्बुधवारी वृक्ष प्राधिकरण समितीची मनपा सभागृहात बैठक झाली. या बैठकीत शहरातील इस्लामाबाद भागात घर क्रमांक ७७७ जवळील लिंबाची दोन झाडे तोडणाºया अन्सारी खुर्शीद अहमद पीर मोहंमद व त्याला झाडे तोडण्यास सांगणाºया मोहंमद आरीफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त धायगुडे यांनी उद्यान अधीक्षक विनय शिंदे यांना दिले आहेत. संबंधितांना दहा हजार रूपये दंड व झाड तोडण्याच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याची शिक्षा करण्यात येणार आहे.

टॅग्स :Malegaonमालेगांव