शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करणाऱ्यास नाशकात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 16:52 IST

२० हजार रु पयांची पिस्तुल, तीन काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली ३० हजार रु पयांची दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ६९० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देपिस्तुल, तीन काडतुसे, दुचाकी जप्त निलगीरी बाग परिसरात सापळा रचला

नाशिक : ठाण्यामधील कळवा पुर्व भागातील एका मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करत झोपलेल्या युवकाला ठार मारत जबरी लूट करणा-या अट्टल गुन्हेगाराला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलसह काडतुसे, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सरफराज हरून अन्सारी (२६, रा. रांची, राज्य झारखंड) असे या संशियत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने नाशिकसह मालेगाव, चांदवड, चाळीसगाव रोड या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास वीर युवराज मेडीकल स्टोअर्सचे शटर उचकटवून चोरट्याने घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र मेडिकलमध्ये प्रेमिसंग किशोरिसंग राजपुरोहित ( ४६ ) हे झोपलेले होते. शटरचा आवाज ऐकून प्रेमिसंग झोपेतून जागा झाला, त्यावेळी अन्सारी याने प्रेमिसंगवर गोळी झाडून त्याचा खून केला होता. तसेच गल्यातील ८ हजार ६५० रु पये घेऊन पोबारा केला होता. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेनंतर ठाणे पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी करु न संशियताचा शोधासाठी तपासाला गती दिली. दरम्यान, गुन्हेगारांच्या आदान प्रदान कार्यक्र मात ठाणे पोलिसांनी संशियताचा फोटो नाशिक पोलिसांकडे पाठविल. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात शोधमोहिम राबविली. आपल्या गोपनीय नेटवर्कद्वारे त्याची चाचपणी सुरू केली. दरम्यान, आडगाव शिवाराजवळील निलगीरी बाग झोपडपट्टीत संशयित सरफराजसोबत काही महिला फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी खात्री करु न दोघी महिला ताब्यात घेतल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्या दोघीही केटरींगचे काम करतात अशी माहिती पुढे आली. सरफराज हा चोरी करत असून तो अधुनमधून नाशिकला आमच्याकडे येत असल्याची कबुली त्या महिलांनी दिली. या माहितीवरून पथकाने गुरु वारी (दि.१५) सरफराजला ताब्यात घेण्यासाठी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर व पोलीस हवालदार केदार यांच्या पथकाने निलगीरी बाग परिसरात सापळा रचला.त्याच्याकडून २० हजार रुपयांची पिस्तुल, तीन काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली ३० हजार रुपयांची दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ६९० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरूध्द बेकायदेशीर शस्त्रवापरल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याला लवकरच ठाणे पोलिसांकडे सोपविले जाणार आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयthaneठाणेArrestअटकFiringगोळीबार