शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वडाळ्यात सहा घरमालकांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:01 IST

भाडेकरू ठेवताना त्यांची कुठलीही माहिती न घेता व पोलिसांना त्याविषयी काहीही न सांगता माहिती दडवून ठेवणाऱ्या वडाळागाव परिसरातील सहा घरमालकांविरुद्ध इंदिरानगर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.

इंदिरानगर : भाडेकरू ठेवताना त्यांची कुठलीही माहिती न घेता व पोलिसांना त्याविषयी काहीही न सांगता माहिती दडवून ठेवणाऱ्या वडाळागाव परिसरातील सहा घरमालकांविरुद्ध इंदिरानगर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.वडाळागाव परिसरात सदनिका व घरे सर्रासपणे भाडेतत्त्वावर दिली जातात. जणू एकप्रकारे हा एक व्यवसायच वडाळागावात सुरू झाला आहे. भाडेतत्त्वावर घर देणे-घेणेच्या व्यवहारात मध्यस्थांकडून चक्क ‘मलिदा’ही लाटला जातो. घरमालकाला भाडेकरू आणि भाडेकरूला घर मिळवून देताना मध्यस्थ मंडळी भाडेकरू ठेवताना घ्यावयाची काळजी आणि पोलीस प्रशासनाचा नियमाविषयी मालक-भाडेकरू दोघांना अनभिज्ञ ठेवताना दिसून येत आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे चुकीचे असून, मालकदेखील जवळच्या पोलीस ठाण्यात भाडेकरूंविषयीची माहिती अथवा भाडेतत्त्वाच्या कराराची सत्यप्रत सादर करत नसल्याचे समोर आले. इंदिरानगर पोलिसांनी याबाबत गंभीर दखल घेत भाडेकरूंची माहिती दडविणाºया मालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.वडाळागावातील मदिनानगर परिसरात भाडेकरूंची माहिती न दिल्याप्रकरणी घराचा मूळ मालक वसीम मुस्तफा कोकणी (३७, रा. कोकणीपुरा), रोशन अली सय्यद (३९, रा.पखालरोड), रियाज अय्युब शेख (४४, रा. पखालरोड) अन्वर लाला शेख, मिसबाउद्दीन मेहंदी हसन खान, समशुद्दीन पापामिया शेख, या सहा घरमालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आबा पाटील, उपनिरीक्षक जावेद शेख, रामचंद्र जाधव, सचिन सोनवणे, भगवान शिंदे, रियाज शेख, राजेश टोपले यांनी मोहीम हाती घेतली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी