फिर्यादीत म्हटले आहे की, विलास सावळीराम गांगुर्डे , कैलास सावळीराम गांगुर्डे, संदीप सावळीराम गांगुर्डे (सर्व रा. सुतारखेडे, ता. चांदवड ) हे घरासमोर आले व तू आमच्या घरातील लोकांवर खोटा संशय घेतो का, असे म्हणून पती विलास पवार यास जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीवरून जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक मोरे तपास करीत आहेत.
जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST