शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्राम्हणवाडे येथील विवाहितेच्या आत्महत्त्येप्रकरणी दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:48 IST

सिन्नर : पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. २९) रोजी रात्री घडली. अंजना अभिमन्यू गिते (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

सिन्नर : पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. २९) रोजी रात्री घडली. अंजना अभिमन्यू गिते (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी हरीभाऊ शंकर जायभाये (रा.जयवंत नगर, ता.भूम, जि. उस्मानाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत अंजनाचा पती संशयित अभिमन्यू भिकाजी गिते व त्याचे अनैतिक संबंधाचा आरोप असलेल्या एका महिलेविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू व संशयित महिला यांच्यात गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही बाब अंजना गिते यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पतीस वारंवार समाजावून सांगितले. मात्र यात कोणतीही सुधारणा झाली नाही. अंजनाच्या समाजावून सांगितल्याचा राग आल्याने अभिमन्यू गिते याने तिला शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच रागातून तसेच अभिमन्यू व संशियत महिला यांच्या जाचास कंटाळून अंजना हिने विषारी औषध प्राशन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिला उपचारार्थ नाशिकरोड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचे निधन झाले. त्यानंतर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी