मालेगाव : येथील आयशानगर भागातील मदिना रुग्णालयासमोरील मैदानात फिर्याद दिल्याची कुरापत काढून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकलाख मुंडी, महेमूद सलीम (दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. मर्चंटनगर यांच्यासह एका अज्ञात व्यक्तीविरोधात आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अब्दुल रहेमान मुशरफ हुसेन (३२) रा. मर्चंटनगर यांनी पोलीस तक्रार दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल याने एकलाख याच्या विरोधात २५ आॅक्टोबर रोजी आयशानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास तिघा संशयितानी संगनमत करून तक्रार दिल्याची कुरापत काढून अब्दुल यास लांकडी दांड्याने, लोखंडी फायटर व कंबरेच्या पट्ट्याने हाताला, डोक्यावर मारहाण करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिघे संशयित आरोपी फरार झाले असून, जमादार एस. एम. सोनवणे तपास करीत आहेत.
फिर्यादीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा
By admin | Updated: November 3, 2015 22:26 IST